ऑपरेशन महादेव ते दुर्गा-ब्रह्मा…, देवाच्या नावाने ऑपरेशन, ज्यांनी इतिहास घडवला

ऑपरेशन महादेव ते दुर्गा-ब्रह्मा…, देवाच्या नावाने ऑपरेशन, ज्यांनी इतिहास घडवला

Operation Mahadev : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना भारतीय सुरक्षा दलांनी ठार मारले असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज लोकसभेत (Lok Sabha) दिली आहे. ऑपरेशन महादेव (Operation Mahadev) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती लोकसभेत बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. मात्र तुम्हाला माहिती आहे का? भारतीय सुरक्षा दलांनी यापूर्वी देखील दहशतवाद्यांवर देवाचे नावाने किंवा त्यांच्याशी संबंधित नावाने ऑपरेशन राबविले आहे.

ऑपरेशन महादेव

22 एप्रिल रोजी पर्यटकांवर पहलगाम येथे झालेल्या दहशवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांनी ऑपरेशन महादेव राबवला आणि तीन दहशतवाद्यांना ठार मारले. काश्मीरमध्ये शिव हे अमरनाथ यात्रेसोबत अध्यात्माचे प्रतीक असल्याने या ऑपरेशनला भगवान शिवाचे नाव देण्यात आले. भारतीय सुरक्षा दलांनी या ऑपरेशन अंतर्गत श्रीनगरमधील दाचिगाम राष्ट्रीय उद्यानाजवळील हरवन भागात केलेल्या कारवाईत तीन दहशतवादी मारले.

ऑपरेशन ब्रह्मा

28 मार्च 2025 रोजी म्यानमार आणि थायलंडमध्ये तीव्र भूकंप झाला होता. यानंतर भारताने मदत आणि बचावसाठी ऑपरेशन ब्रह्मा सुरु केले. विश्वाचे निर्माते भगवान ब्रह्मा यांच्या नावाने ऑपरेशन सुरु करण्यात आला होता. भारताने या ऑपरेशन अंतर्गत भारतीय सैन्याच्या 50 (आय) ब्रिगेडची एक तज्ज्ञ बचाव पथक तातडीने म्यानमारला पाठवली होती. भारतीय सैन्याच्या फील्ड हॉस्पिटल युनिटच्या 118 सदस्यांसह 60 टन मदत साहित्य वाहून नेणारी दोन सी-17 विमाने म्यानमारला पाठवण्यात आली होती.

ऑपरेशन देवी शक्ती

2021 भारताने ऑपरेशन राबवत अफगाणिस्तानातून आपले सर्व नागरीकांना बाहेर काढले होते. अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर 2021 मध्ये तालिबाने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर भारताने ऑपरेशन देवी शक्ती राबवला. भारत सरकारने ताबडतोब तिथून आपल्या सर्व नागरिकांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी, भारतीय हवाई दलाने ऑपरेशन देवी शक्ती चालवली आणि आठशेहून अधिक भारतीयांना त्यांच्या देशात सुरक्षितपणे परत आणण्यात आले. यामध्ये सामान्य लोक तसेच अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

ऑपरेशन गंगा

2022 मध्ये भारताने ऑपरेशन गंगा राबवत युक्रेनच्या शेजारील देशांमधून 20 हजार भारतीयांना परत आणण्यासाठी विशेष विमाने चालवली होती. 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा मोठ्या संख्येने भारतीय तिथे अडकले होते. यानंतर भारताने युक्रेनच्या शेजारील देशांमधून 20 हजार भारतीयांना परत आणण्यासाठी विशेष विमाने चालवली. युक्रेनमधून रोमानिया आणि हंगेरी इत्यादी ठिकाणी भारतीयांना विविध मार्गांनी विमानाने हलवण्यात आले.

थिएटरनंतर आता ‘सितारे जमीन पर’ झळकणार यूट्यूबवर; आमिर खानचा क्रांतिकारी निर्णय

ऑपरेशन दुर्गा

हरियाणाच्या मनोहर लाल खट्टर सरकारने मुली आणि महिलांना त्रास देणाऱ्या गुंडांवर कारवाई करण्यासाठी ऑपरेशन दुर्गा पथकाची स्थापना केली होती. गुंडांवर कठोर कारवाई करण्यासाठी या पथकाने 13 एप्रिल 2017 रोजी राज्यात ऑपरेशन दुर्गा सुरू केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube