पाटणा : पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार असून, यावेळेसही मोदींचाच विजय होईल असा दावा भाजपकडून केला जात आहे. भाजपचा हा दावा खोडून काढण्यासाठी देशभरातील प्रमुख विरोधी पक्षांची एकत्रित बैठक आज (दि.23) पाटण्यात पार पडली. यात भाजपच्या विरोधात एकजुटीने लढण्याच्या मुद्द्यावर एकमत झाल्याचे नितीश कुमार यांनी सांगितले. तर, द्वेषाच्या राजकारणाविरोधात आम्ही एकजुटीने पुढे जाऊ, असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. विरोधी पक्षांची पुढील बैठक १२ जुलै रोजी शिमला येथे होणार असून, त्यात पुढील रणनीती ठरवली जाईल असे खर्गेंनी स्पष्ट केले. (Patna Opposition Parties Meeting Update)
केजरीवालांना झाली घाई पण, काँग्रेसचे वेट अँड वॉच; विरोधकांच्या बैठकीतही पत्ते झाकलेलेच!
लिट्टी चोखा, गुलाबजाम आणि चर्चा – राहुल गांधी
यावेळी बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत विविध पक्षांच्या नेत्यांनी भाष्य केले. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी बैठकीत नेमकं काय झालं हे सांगण्यापूर्वी नितीश कुमार यांनी कसा पाहुणचार केला याबद्दल भाष्य केले. ते म्हणाले की, नितीश कुमार यांनी जेवणात लिट्टी चोखा आणि गुलाबजामची व्यवस्था केली होतीत्याबद्दल त्यांचे अनेक आभार. आमच्या सर्वांचे मतभेद असतील, परंतु आम्ही सर्वांनी एकत्र काम करण्याचे निश्चित केले आहे. आजची बैठक ही विरोधी ऐक्याची प्रक्रिया असून, ती पुढे जाणार असल्याचा विश्वास यावेळी राहुल गांधी व्यक्त केला. देश वाचवण्यासाठी काँग्रेस बलिदान देण्यास तयार आहे.
VIDEO | "It is a battle of ideologies. Indeed, there will be differences amongst us but we have decided to work together and protect the ideologies shared by us," says Rahul Gandhi after opposition meeting held in Patna.#OppositionUnity #OppositionParties… pic.twitter.com/TNBCXckjs6
— Press Trust of India (@PTI_News) June 23, 2023
काय म्हणाले नितीश कुमार?
नितीश कुमार म्हणाले की, विरोधकांची पुढील बैठक शिमला येथे पार पडणार असून, यात जागांबाबत रणनीती निश्चित केली जाणार आहे. सर्व विरोधी पक्षांनी आतापासून एकत्र लढण्याचा निर्धार केल्याचे ते म्हणाले. आज भाजप देशाचा इतिहास बदलत आहे. जर ते पुन्हा जिंकून परत आले तर ते देशाचे संविधानही बदलतील.
Patna Opposition Parties Meeting : विरोधकांचे मिशन 2024! पण, राऊतांनी व्यक्त केली वेगळीच ‘भीती’
पुढील बैठक शिमल्यात होणार
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आम्ही सर्वजण एकत्र लढण्याचा समान अजेंडा घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढील बैठक 10 किंवा 12 जुलैला शिमल्यात होणार असून, 2024 च्या लोकसभा निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा सामायिक अजेंडा पुढील बैठकीत निश्चित केला जाईल. आम्हाला प्रत्येक राज्यात वेगळ्या पद्धतीने काम करावे लागेल असेही खर्गे यांनी यावेळी स्पष्ट केले.
ममता बॅनर्जी
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पाटणा येथे झालेली बैठक अतिशय चांगली झाली. आम्ही सर्वजण एक असून, पुढील काळात सर्वजण एकत्र लढण्यावर एखमत झाल्याचे त्या म्हणाल्या. पाटण्यातून सुरू झालेल्या आंदोलनांना यश मिळते असा इतिहास असून, मोदी हटावसाठी सुरू झालेल्या या मोहिमेलाही नक्कीच यश मिळेस असा विश्वास बॅनर्जी यांनी व्यक्त केला.
पिंग-पोंग बॉल, फुगे अन् बर्फाचा वापर करुनही ‘टायटॅनिक’ अद्यापही समुद्रातच, वैज्ञानिक ठरले फेल…
उद्धव ठाकरे
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहोत. मतभिन्नता असू शकते पण देश एक आहे. देशाची एकता आणि अखंडता वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. सुरुवात चांगली झाली असून, पुढचा प्रवासही चांगलाच होईल.
VIDEO | "Just like the JP movement, which started here (Patna), our united front will get the blessings of the people," says NCP supremo Sharad Pawar after opposition meeting in Patna.#OppositionMeeting pic.twitter.com/D5YNEaPLJC
— Press Trust of India (@PTI_News) June 23, 2023
या दिग्गजांची होती हजेरी
आज पार पडेलेल्या विरोधकांच्या बैठकीसाठी पाटण्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी खासदार राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) सरचिटणीस सीताराम येचुरी आदी वरीष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते.