Parliament Security Breach : संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे. संसद सुरक्षा भंग प्रकरणात (Parliament Security Breach) एकूण 6 जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (police) चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर दोघांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. आता या प्रकरणात आणखी कठोर पावले उचलण्यात आली असून या लोकांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलीस स्पेशल सेल या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
दुसरीकडे संसदेतील घटना घडल्यानंतर काही वेळातच दोन लोकांनी पिवळा आणि लाल धूर पसरवला आणि संसद भवनाच्या दालनाबाहेरील चौकात घोषणाबाजी केली. या दोघांनाही दिल्ली पोलिसांनी लगेच अटक केली. यातील एक जण महाराष्ट्रातील लातूर येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. संसेदेची सुरक्षा लक्षात घेता आता प्रेक्षक गॅलरीचे पास देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना आता संसदेचे कामकाज पाहण्यासाठी पासवर एन्ट्री दिली जाणार नाही.
Parliament security breach | Delhi police special cell has registered a case under the UAPA section. Investigation underway: Delhi police special cell
— ANI (@ANI) December 14, 2023
काय घडली घटना ?
खासदार अरविंद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभेत शून्य प्रहाराचे कामकाज सुरु होते. अचानक प्रेक्षक गॅलरीतून तिघे जण खांबाला धरुन लटकले. त्यातील दोन जणांनी खाली उडी घेतली आणि ते लोकसभेतील बाकांवर इकडून तिकडे पळत होते. त्याचवेळी तिसऱ्या व्यक्तीने बुटातून काही तरी गॅसचा फवारा केला. यामुळे उपस्थित खासदारांच्या नाकात आणि डोळ्यात जळजळ सुरु झाली. त्यानंतर सभागृह तहकूब झाले. सुरक्षा रक्षकांनी या तिघांनाही ताब्यात घेतले असून ते जे काही पुढील कारवाई असेल ते करत आहेत. पण या तिघांनी कोणत्याही घोषणा दिल्या नाहीत किंवा आरडाओरड केली नाही. त्यामुळे ते नेमके कशासाठी आले होते याचा अंदाज लागू शकलेला नाही, असेही सावंत म्हणाले.
Parliament Security Breach : संसदेत धूर करून ‘तानाशाही नहीं चलेगी’ म्हणणारे चौघं कोण?
आरोपी एकमेकांच्या ओळखीचे होते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी एकमेकांना आधीच ओळखत होते. संसदेच्या आत आणि संसदेबाहेरील लोकांचा उद्देश एकच होता. हे सर्व आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर त्यांनी एक योजना आखली. लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या आरोपींची नावे मनोरंजन आणि सागर शर्मा अशी आहेत. मनोरंजन हा म्हैसूरचा रहिवासी आहे. संसदेबाहेरील आंदोलनात अटक करण्यात आलेल्या या दोघांकडे आधारकार्ड किंवा कोणतेही ओळखपत्र नव्हते. आपण कोणत्याही संघटनेशी संबंधित नसल्याचं त्यांनी म्हटले आहे, ते स्वतःहून संसदेत आले आहेत. त्यांच्या चौकशीसाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे.