निवडणुका संपताच नागरिकांना महागाईचा फटका; पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढणार

पेट्रोल आणि डिझेलचा भआव न वाढवल्यास भविष्यात भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती गंभीर होऊ शकते.

News Photo   2026 05 06T191136.408

निवडणुका संपताच नागरिकांना फटका बसणार; पेट्रोलच्या किंमतीचा वाढणार

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात फेब्रुवारी (Petrol) महिन्यापासून युद्ध सुरू आहे. मधल्या काळात ते थांबलही. परंतु, दोन्हीकडूनही कुरघोड्या सुरूच आहेत. आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत गॅसचीही मोठी टंचाई देशभरात जाणवत राहिली आहे.

भारतात कच्च्या तेलाची टंचाई असली तरीही अद्याप पेट्रोल आणि डिझेलच्या भाववाढीची झळ सामान्यांना फारशी बसलेली नाही. परंतु आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आशिया पॅसिफिक विभागाचे संचालक कृष्ण श्रीनिवासन यांनी मोठा आणि गंभीर इशारा दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलचा भआव न वाढवल्यास भविष्यात भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती गंभीर होऊ शकते, असे ते म्हणाले आहेत.

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय, 2028 पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकींना बंदी

यासोबतच भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवण्यावर लक्ष द्यावे लागेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे. श्रीनिवासन हे 5 मे रोजी नॅशनल काऊन्सिल ऑफ अप्लाईड इकोनॉमिक्स रिसर्चच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी कच्च्या तेलाचा भाव वाढल्याने त्याचा परिणाम सामान्यांवर आहे. कच्च्या तेलाची किंमत वाढल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलची किंमत न वाढल्यास त्याचा परिणाम संपूर्ण बाजारावरच पडेल, असे मत श्रीनिवासन यांनी व्यक्त केले.

त्याचबरोबर खतांची किंमत कमी केल्यास लोकांना बसणारी झळ थोडीशी कमी होईल, असेही ते म्हणाले. इराण आणि अमेरिकेतील वादाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर पडला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने कच्चे तेल महागले आहे. सध्या ब्रेंट क्रूड तेलाचा भाव प्रति बॅरल 110 रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, श्रीनिवासन यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर भारत सरकार पेट्रोल, डिझेलच्या किमतीत आणखी वाढ करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Exit mobile version