भारताची अर्थव्यवस्था खरचं मेली आहे का?; ट्रम्प यांच्या विधानात किती तथ्य? वाचा आकडेवारी

भारताची अर्थव्यवस्था खरचं मेली आहे का?; ट्रम्प यांच्या विधानात किती तथ्य? वाचा आकडेवारी

India Economy : देशाच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) चर्चेत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या सुरु असणारा युद्ध थांबवला असल्याचा दावा ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून करत असल्याने विरोधक पंतप्रधान मोदींवर (PM Modi) जोरदार हल्लाबोल करत आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेत भारतावर 25 टक्के टॅरिफ लावल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. 25 टक्के टॅरिफसह रशियासोबत सुरु असणाऱ्या व्यापारामुळे ट्रम्प यांनी भारतावर दंड देखील ठोठावले आहे. तर आता ट्रम्प यांनी भारताची आणि रशियाच्या अर्थव्यवस्थेला (India Economy) मृत म्हटले आहे. मात्र भारताची अर्थव्यवस्था खरंच मृत आहे का? याबाबत आकडेवारी काय सांगते हे जाणून घ्या.

आयएमएफचा भारतावर विश्वास

आयएमएफने भारताला जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था मानली आहे. पुढील दोन वर्षात भारताची अर्थव्यवस्था 6.4 टक्के दराने वाढणार असा दावा आयएमएफने केला आहे. त्यामुळे भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असा विश्वास आयएमएफने व्यक्त केला आहे. तर 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी विकास दर 6.4 टक्के राहणार असा अंदाज देखील आयएमएफकडून वर्तवण्यात आला आहे. तर अमेरिकेचा जीडीपी विकास दर 1.9 टक्के राहणार असल्याचा अंदाज आयएमएफने वर्तवला आहे.

जागतिक बँक काय म्हणतो?

तर दुसरीकडे आयएमएफसह जागतिक बँकने देखील भारताच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास दाखवला आहे. एप्रिलमध्ये जागतिक बँकेने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी भारताचा जीडीपी विकास दर 6.7 टक्क्यांवरुन 6.3 टक्के केला होता पण जूनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरणार असं म्हटले आहे.

रेटिंग एजन्सींना भारताच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास

जागतिक रेटिंग एजन्सींना देखील भारताच्या अर्थव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. जुलैमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात आशियाई विकास बँकेने 2025-26 या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 6.7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर जागतिक क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीजने म्हटले आहे की 2025 या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढ 6.3 टक्के राहील.

अतिरिक्त आयुक्तांची शाळेला अचानक भेट, केली शालेय साहित्याची तपासणी

एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने त्यांच्या आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक आउटलुक अहवालात म्हटले आहे की, मजबूत देशांतर्गत मागणीमुळे भारताचा आर्थिक विकास दर 2025-26 या वर्षात 6.5 टक्के राहू शकतो. तर फिच रेटिंग्जने म्हटले आहे की, 2028 पर्यंत भारताचा विकास दर 6.4% राहील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube