PM Modi broke Protocol Vladimir Putin change Shake Hand Style what message for world : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) हे गुरूवारी संध्याकाळी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) स्वतः विमानतळावर त्यांच्या स्वागतसाठी उपस्थित होते. त्यांनी दोघांनी एकमेकांची गळाभेट आणि शेकहॅन्ड केला. मात्र त्यांच्या या शेकहॅन्डवरून विविध अर्थ काढले जात आहेत. कारण र पुतीन मोदींना भेटले तेव्हा त्यांनी त्यांची शेकहॅन्डची स्टाईल बदलली होती. हे प्रकरण नेमकं काय?
वैद्यकीय शिक्षण, मोफत पर्यटक व्हिसा ते शिपिंग; रशिया अन् भारतातील करारानं काय बदलणार?
दरम्यान कोणत्याही राष्ट्रप्रमुखाला एअरपोर्टवरून आणण्याचे काम परराष्ट्र मंत्रालायाचे असते त्याचे काही नियम आहेत. मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) हे गुरूवारी संध्याकाळी भारताच्या दौऱ्यावर आले त्यावेळी त्यांना घेण्यासाठी थेट पंतप्रधान मोदी एअरपोर्टवर गेले.मोदींनी प्रोटोकॉल मोडून हे काम केलं. त्यामुळे रशियाला आनंद झाला. त्यानंतर पुतीन थेट पंतप्रधान निवासावर पोहचले. येथेही या दोघांनी शेकहॅन्ड केलं. त्यानंतर त्यांची चर्चा झाली. त्यानंतर पुतीन हे डिनर करून त्याच्या प्रेसिडेन्शिअल सुटमध्ये गेले.
इंडिगो विमान कंपनीचे सर्व उड्डाणं रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट
दरम्यान एकच चर्चा सुरू झाली ती पुतीन यांच्या शेकहॅन्डची कारण पुतीन कोणत्याही नेत्याशी संवाद साधताना हॅन्ड ओव्हर हॅन्ड पॉलिसीचा वापर करतात. त्यात ते त्या नेत्याशी लो ग्रिप स्टाईलमध्ये हात मिळवणी करतात. त्यात त्यांचा हातवर तर समोरच्या नेत्याचा हात खाली असतो.त्यातून पुतीन हे मी समोरच्या नेत्या पेक्षा उच्च आहे. तसेच मी पूर्णपणे नियंत्रणात आहे. असे दोन अर्थ निघत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी पुतीन यांनी लो ग्रिप स्टाईलमध्ये हात मिळवणी करतात.
पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीला अजितपर्व येणार? अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा
मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) हे गुरूवारी संध्याकाळी भारताच्या दौऱ्यावर आले. मोदींनी त्यांचं एअरपोर्टवर स्वागत केलं.त्यांच्यात चर्चा झाली.त्यावेळी मात्र पुतीन यांनी त्यांचा शेकहॅन्ड बदलला. दिल्लीच्या पालम एअरपोर्टवर पुतीन मोदींना भेटले. तेव्हा त्यांनी त्यांची शेकहॅन्डची स्टाईल बदलली होती. लो ग्रिप स्टाईल ऐवजी मोदींशी त्यांनी सामान्यपणे हात मिळवणी केली आहे. त्याचे फोटो सध्या सोसल मिडीयावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये दोघेही एकमेकांशी सामान्यपणे हात मिळवणी करत आहेत. त्यात कोणाचाही हात वर किंवा खाली नाही. म्हणजेच कुणीच कुणापेक्षा वरचढ नाही. त्यातून दोघांमध्ये आणि दोन्ही देशांतील संबंध चांगले आहेत.
