Download App

खरंच सोपं नाही! ब्रह्म मुहूर्तावर उठणं, नारळ पाण्याचं सेवन अन् जमिनीवर झोप; प्राणप्रतिष्ठेसाठी मोदी काय-काय करतात?

PM Modi Special Anushthan for Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत श्रीराम मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्टने या सोहळ्याची (Ayodhya Ram Mandir) तयारी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राणप्रतिष्ठ होणार आहे. पीएम मोदी ज्यावेळी नाशिकमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी अकरा दिवसांचे अनुष्ठानाची माहिती दिली होती. आज त्यांच्या या अनुष्ठानाचा दहावा दिवस आहे. आता अनुष्ठान म्हणजे काय? याचे काय नियम असतात? पंतप्रधान मोदी कशा पद्धतीने या नियमांचे पालन करत आहेत असे प्रश्न पडले असतील. या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या…

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेआधी पंतप्रधान मोदी अकरा दिवसांच्या अनुष्ठानावर आहेत. या दरम्यान ते दररोज एका विशेष मंत्राचा जप करत असतात. अध्यात्मिक जगतातील काही सिद्धी प्राप्त संतांकडून हा मंत्र देण्यात आला आहे. दररोज ब्राह्म मुहूर्तावर (पहाटेची वेळ) 1 तास 11 मिनिट या मंत्राचा जप मोदी करतात. या मंत्राचा जप 11 दिवस करायचा आहे.

PM Modi : ते अर्धी भाकरी खा, म्हणायचे पण आता मोदी आहेत पूर्ण भाकरी खा; कॉंग्रेसच्या गरिबी हटाववर मोदींचा निशाणा

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेआधी एका ऑडिओ संदेशात पीएम मोदी यांनी या प्रसंगाचे वर्णन केले होते. त्यानंतर त्यांनी अकरा दिवसांचे अनुष्ठान सुरू केल्याचे सांगितले होते. या अनुष्ठानाचे नियम अत्यंत कठोर आहेत. जमिनीवर झोपणे, आहारात फक्त नारळ पाणी घेणे, गोपूजा आणि दान करणे अशा काही नियमांचा समावेश आहे. दिवसभराचे अतिशय व्यस्त वेळापत्रक असतानाही या नियमांचे पालन तितक्याच कठोरपणाने केल्याचे मोदी यांनी सांगितले होते.

मागील काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी देशातील मंदिरांना भेटी देत आहेत. नाशिकमधील रामकुंड आणि काळाराम मंदिर (Kalaram Mandir), आंध्र प्रदेशातील लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिर, केरळमधील गुरुवायूर आणि त्रिप्रयार श्री रामास्वामी मंदिर येथे गेले होते. मोदी ज्या मंदिरांना भेटी देत आहेत त्या मंदिराचा प्रभू श्रीरामांबरोबर काहीना काही संबंधही आहे.

Ram Mandir : सोन्या-चांदीच्या खडावा ते 2100 किलोंची घंटा; श्रीरामांसाठी अयोध्येत आल्या 10 खास भेटवस्तू

पीएम मोदीच मुख्य अतिथी 

22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदीच प्रमुख अतिथी असणार आहेत. याची माहिती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात मुख्य अर्चक असणारे पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांनी दिली. ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यजमान असतील अशा चर्चा मध्यंतरी होत्या. मात्र या चर्चा दीक्षित यांनी फेटाळून लावल्या.

follow us