Ram Mandir : प्राणप्रतिष्ठेआधी मोठी चूक; फोटो लीक करणाऱ्याचा शोध सुरू, नेमकं काय घडलं?

Ram Mandir : प्राणप्रतिष्ठेआधी मोठी चूक; फोटो लीक करणाऱ्याचा शोध सुरू, नेमकं काय घडलं?

First visuals of Ram Lalla inside Ayodhya Ram Mandir complex :  अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आता फक्त एकच दिवस राहिला आहे. त्याआधी रामलल्लांची मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवण्यात आली. या मूर्तीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र यामुळेच आता वाद निर्माण झाला आहे. कारण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या मूर्तीला अद्याप श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने दुजोरा दिलेला नाही. इतकेच काय तर मूर्तीचे फोटो काढणाऱ्याचा ट्रस्टकडून शोध घेतला जात असून त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. सध्या सोशल मीडियावर श्रीरामाचा जो फोटो व्हायरल होतो आहे तो एका कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काढला आहे. आता या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत ट्रस्टने दिले आहेत.

Ram Mandir : सोन्या-चांदीच्या खडावा ते 2100 किलोंची घंटा; श्रीरामांसाठी अयोध्येत आल्या 10 खास भेटवस्तू

अयोध्येतील राम मंदिरातील गाभाऱ्यात गुरुवारी राममूर्ती स्थापित करण्यात आली होती. याआधी या मूर्तीला परिसरातून भ्रमण करण्यात आले होते. परिसरात ठिकठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली होती. कर्नाटक येथील प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज (Arun Yogiraj) यांनी ही मूर्ती तयार केली आहे. या मूर्तीचे वजन जवळपास दोन टन असल्याचे सांगितले जात आहे. मूर्तीला झाकून ठेवण्यात आले होते. शुक्रवारी अनावरण करण्यात आले. मूर्ती भ्रमणावेळी रामभक्तांनी फुलांचा वर्षाव करत प्रभू श्रीरामांचे स्वागत केले. जय श्रीरामच्या घोषणांनाी परिसर दणाणून गेला होता.

सोशल मीडियावर सध्या जी रामाची मूर्ती व्हायरल होत आहे त्याचे शुक्रवारी अनावरण झाले होते. काळ्या दगडांपासून तयार केलेल्या या मूर्तीचे डोळे पिवळ्या रंगाच्या वस्त्राने झाकून ठेवले होते. विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी शरद शर्मा यांनी सांगितले की रामलल्लांच्या मूर्तीच्या डोळ्यांवर पिवळ्या रंगाचे कापड बांधले आहे. याचा एक फोटोही प्रसिद्ध करण्यात आला आहे. यानंतर आता सोमवारी विधीवत मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्याची तयारी ट्रस्टकडून केली जात असतानाच फोटो लीक झाल्याने खळबळ उडाली आहे.

भाजपकडून निवडणुकीतील फायद्यासाठी राम मंदिर उद्घाटनाचा इव्हेंट; कॉंग्रेस नेते रमेश चेन्नीथलांचे टीकास्त्र

दरम्यान, येत्या 20 ते 24 जानेवारी 2024 च्या दरम्यान कोणत्याही दिवशी राम मंदिरामध्ये प्रभु श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी सहभागी होऊ शकतात. मात्र पंतप्रधान कार्यालयाकडून त्याची अंतिम तरिख निश्चित झालेली नाही. राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात प्रभू श्रीरामांची मूर्ति मंदिराच्या गर्भगृहात स्थापन केली जाणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube