Happy Birthday PM Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आज वाढदिवस आहे. विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून उदयास आलेल्या पीएम मोदींचा वाढदिवस अगदी भव्य दिव्य असा साजरा करण्याचा संकल्प भाजपाने (BJP) सोडला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. तसेच पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात विश्वकर्मा योजना सुरू करण्याची घोषणा केली होती. या योजनेचा शुभारंभही आज करण्यात येणार आहे.
नरेंद्र मोदी आज 73 वर्षांचे झाले आहेत. मागील 22 वर्षांपासून मोदी संवैधानिक पदावर आहेत. 2001 मध्ये मोदी पहिल्यांदा गुजरात राज्याचे मुख्यमंत्री बनले. सलग तेरा वर्षे ते या पदावर कायम होते. त्यानंतर 2014 मध्ये प्रधानमंत्री बनल्यानंतर मोदी देशाच्या राजकारणात आले. सलग दोन वेळा लोकसभेच्या निवडणुका जिंकून पंतप्रधानपदावर आहेत. आता त्यांची दुसरी टर्म लवकरच पूर्ण होणार आहे. 2024 च्या निवडणुकीत भाजप विजयी होऊन पुन्हा मोदीच पंतप्रधान होतील असा दावा भाजपकडून केला जात आहे. यावेळी मात्र मोदींसमोर इंडियाचे मोठे आव्हान आहे. विरोधकांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. भाजपला सत्तेतून बेदखल करणे हे एकच उद्दीष्ट ठेऊन आपल्या विचारधारा बाजूला ठेऊन सगळे विरोधक एकत्र आले आहेत.
India Alliance Rally : इंडियाची आघाडीची भोपाळमधील पहिलीच सभा रद्द; कमलनाथ यांची माहिती
7 ऑक्टोबर 2001 मध्ये ज्यावेळी मोदी पहिल्यांदाच गुजरातचे मुख्यमंत्री बनले तेव्हा गुजरातमध्य भूकंपाचे झटके बसले. केशुभाई पटेल यांच्या राजीनाम्यानंतर भाजपात खळबळ उडाली होती. त्यानंतर पुढे सहाच महिन्यात गोध्रा कांड झाले. 28 फेब्रुवारी 2002 मध्ये राज्यात ठिकठिकाणी दंगली झाल्या. त्यातच या वर्षात विधानसभेच्या निवडणुकाही होणार होत्या. तरी देखील या कठीण परीक्षेत मोदी पास झाले. राजनितीक दबाव झुगारून देत त्यांनी नेतृत्व केले आणि विजयी देखील झाले. यानंतर 2007 आणि 2012 च्या निवडणुकांतही भाजपला प्रचंड यश मिळाले. दोन निवडणुका जिंकल्यानंतर मोदी देशातही लोकप्रिय झाले. विरोधकांकडून मोदींना नेहमीच टार्गेट केले गेले.
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी हिंदूहृदयसम्राट अशी प्रतिमाही तयार केली. गुजरात मॉडेलचा प्रचार इतका चांगला झाला की अन्य राज्यांतही त्याची चर्चा होऊ लागली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर मोदी अपराजेय दिसू लागले. आता विरोधकांच्या इंडिया आघाडीसमोरही हाच प्रश्न आहे की 2024 च्या निवडणुकीत मोदींना आव्हान देऊ शकेल असा चेहरा कोण आहे. नेता घोषित करण्याचे आव्हान आघाडीसमोर ठाकले आहे. जर निवडणुकीआधी नेता घोषित केला तर त्याची तुलना पीएम मोदींशी केली जाईल आणि जर नेता घोषित केलाच नाही तर इंडिया आघाडी विखुरलेली दिसेल असे दुहेरी संकट आघाडीसमोर सध्या आहे.
बायडन अन् सुनक यांना पिछाडले; जागतिक नेत्यांमध्ये PM मोदी पुन्हा अव्वल
केंद्रातील राजकारणात मोठे बदल भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरच झाले आहेत. 1989 च्या निवडणुकीत विश्वनाथ प्रताप सिंह यांनी बोफोर्सचा मुद्दा उचलला होता. त्यांच्याकडे घोटाळेबाज काँग्रेसच्या नेत्यांची यादीच आहे असा दावा ते जाहीर सभांत करत होते. यानंतर नरसिंहराव यांचे सरकारही घोटाळ्यात अडकले होते. याचा फायदा भाजपला मिळाला. त्यानंतर आलेले मनमोहन सिंह यांचे सरकार दहा वर्षे टिकले मात्र, कोळसा घोटाळा, 2 जी आणि कॉमनवेल्थ या घोटाळ्यांवर सरकार अडचणीत आले. यामुळे काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर काँग्रेसनेही सत्तेतील नरेंद्र मोदी सरकारवर घोटाळ्यांचे आरोप केले पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.
2019 मध्ये काँग्रेसने राफेल खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा उचलला होता. नोटबंदीच्या निर्णयातही मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. अदानी अंबानींचा मुद्द्यावरही मोदी सरकारला टार्गेट केले. पण, हे सगळेच डाव फेल गेले. 2024 मध्ये इंडिया आघाडी याच मुद्द्यांवर भाजप सरकारला घेरण्याचा प्रयत्न होईल असे दिसते मात्र दुसरीकडे या आघाडीतीलच काही नेत्यांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चौकशी सुरू आहे. त्यामुळे आघाडीचे राजकारण कसे असेल याची उत्तरे लवकरच मिळतील.