Pm Narendra Modi Speech : नव्या संसदेत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट सादर केल्यानंतर आता केंद्र सरकारकडून देशाच्या विकासाच्या दृष्टीने नवनवीन धोरणे मांडण्यात येत आहेत. अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांची पुन्हा विरोधकांवर गाडी घसरल्याचं पाहायला मिळालं आहे. विरोधकांकडे निवडणूक लढवण्याची हिंमतच नाही, अशी उपरोधिक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केली आहे. यावेळी संसदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार टोमणेनाट्यच रंगल्याचं दिसून आलं आहे.
मोठी बातमी : झारखंडमध्ये पुन्हा ‘सोरेन’ राज; 47 आमदारांच्या पाठिंब्यावर चंपाई यांनी सिद्ध केलं बहुमत
पंतप्रधान मोदी म्हणाले, विरोधक बराच काळ विरोधातच राहणार आहेत. विरोधकांच्या या संकल्पाचं मला कौतूक आहे. विरोधक आत्ता जिथं आहात त्यापेक्षा अधिक उंचीवर विरोधक जाणार आहेत. पुढील निवडणूकीत विरोधक प्रेक्षक गॅलरीत दिसतील. निवडणूक लढवण्याचा आत्मविश्वासही विरोधकांनी गमावला आहे,. अनेकांनी मतदारसंघ बदलले आत्ताही बदलण्याच्या विचारात आहेत, राज्यसभेतही जाण्याच विचार करीत आहेत, विचार करुन करुन ते आपले रस्ते शोधत आहेत. विरोधकांची परिस्थिती पाहता निवडणूक लढवण्याची हिंमतच राहिली नसल्याची टीका मोदींनी केली आहे.
ललित कला केंद्र तोडफोड प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक निलंबित, कर्तव्यातील कसुरी भोवली
तसेच सध्या काँग्रेसच्या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं आहे. विरोधकांच्या आजच्या परिस्थितीसाठी काँग्रेसचाच दोष असून काँग्रेसला एक चांगला विरोधी पक्ष बनण्याची संधी मिळाली आहे. मात्र, मागील 10 वर्षांत काँग्रेस दायित्व सिद्ध करण्यास कमी पडलं आहे. आता निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे काँग्रेसने जोरदार हालचाली कराव्यात, मेहनत करावी, असा उपरोधिक सल्लाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
यंदाच्या ‘ग्रॅमी’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही नामांकन! पुरस्कार सोहळा कुठे पाहता येणार? …
देशात घराणेशाही लोकशाहीला घातक आहे. आज आपण पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. देशात विकास झाला नाही का? माझ्या तिसऱ्या टर्ममध्ये भारत सर्वात मोठी अर्थव्यवस्ता बनणार असून गरीबांसाठी आम्ही 4 कोटी घरं उभारली, काँग्रेस घराणेशाहीवर आधारित असून काँग्रेसच्या वेगाने या विकासाला 100 वर्ष लागली असते अशीही टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.