Download App

Manipur Violence : ‘मणिपूरचा इतिहास समजून घ्या’; पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावलं…

मणिपूरचा इतिहास समजून घ्या', या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना सुनावलं आहे. दरम्यान, काल अधिवेशनात विरोधकांनी मणिपूर मुद्द्यावरुन घोषणाबाजी केली होती.

Image Credit: Letsupp

PM Narendra Modi Speak On Manipur : राज्यसभेत मणिपूर हिंसाराच्या (Manipur Violence) मुद्द्यावरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं जात असल्याचं दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कालच्या भाषणादरम्यान, विरोधकांनी ‘मणिपूरला न्याय द्या’ अशी घोषणाबाजी करीत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केलायं. त्यानंतर आज मोदींनी विरोधकांना कडक शब्दांत सुनावलंय.

Electricity: सरकार वीजचोरी कशी रोखणार?, मराठवाड्यातून खळबळजनक आकडेवारी समोर

विरोधकांकडून मणिपुरच्या आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न होत असून विरोधकांनी त्यांच्या कारवाया थांबवाव्यात नाहीतर एक वेळ अशी येईल की मणिपूर विरोधकांना नाकारेल, ज्यांना मणिपुरचा इतिहास माहित आहे, त्यांना माहितये की तिथला संघर्षाचा इतिहास मोठा असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

ठरलं! राहुल गांधींनी पवारांचं आमंंत्रण स्वीकारलं; पंढरीच्या वारीत होणार सहभागी, तारीख आली समोर

मणिपुरमध्ये असलेल्या परिस्थितीवरुन तिथे 10 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करावी लागली होती, हे काँग्रेसने विसरु नये पण आमच्या काळात असं झालेलं नाही. 1993 मध्येही अशा प्रकारचा हिंसाचार झाला होता. हा इतिहास समजूनच पुढे जायला हवे, असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलंय.

तसेच सध्या मणिपुरची परिस्थिती पहिल्यापेक्षा चांगली होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा अनेक दिवस मणिपुरमध्ये राहुन आलेले आहेत. तिथे दोन्ही समाजातील संबंध चांगले करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न करीत असल्याचं पंतप्रधान मोदींनी लोकसभेत सांगितलंय.

धक्कादायक! मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा हट्ट करत महिलेने कापली नस; विधानभवना बाहेरील घटना

विरोधकांना मणिपूर स्विकारणार नाही…
मणिपुरमध्ये सुरु असलेली परिस्थिती ठीक करण्यासाठी सर्वांनाच एकत्रितपणे येत काम कराव लागणार आहे. हे आपलं सर्वांच कर्तव्य आहे. नाही तर एक वेळ अशी येईल मणिपूर विरोधी पक्षाला स्विकारणार नसल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

follow us

वेब स्टोरीज