धक्कादायक! मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा हट्ट करत महिलेने कापली नस; विधानभवना बाहेरील घटना
Women Cut vein in Vidhanbhavan area who wants to Meet CM Shinde : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये विविध विषयांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. तर दुसरीकडे विधानभवन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांना भेटण्याचा हट्ट करणाऱ्या एका महिलेने विधानभवना बाहेर (Vidhanbhavan area) स्वतः ची नस कापून (Women Cut vein) घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मंगळवारी विधानभवनाच्या बाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी एक महिला आली होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी तिला अडवलं. मात्र या महिलेने मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्याचा हट्ट धरला. तसेच आपल्या सोसायटी आणि घरामधील अडचणींबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून सांगायचं आहे. असेही महिला म्हणत होती.
माऊलींच्या पालखीचे भक्तांना मंत्रमुग्ध करणारे दिवेघाटातील विहंगम दृश्ये, पाहा फोटो
मात्र सुरक्षा रक्षकांनी तिला आत सोडले नाही. त्यामुळे आज संतापलेल्या महिलेने ब्लेडने वार करत हाताची नस कापून घेतली. ही घटना घडतात पोलिसांनी तात्काळ या महिलेला ताब्यात घेत तिला उपचारांसाठी जीटी रुग्णालयात दाखल केले. ही महिला कोण आहे? कुठून आली आहे? याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आले नसून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
साखर पट्ट्यातल्या राष्ट्रवादीच्या सात आमदारांवर मोदी सरकारची कृपा; 1898 कोटी रुपये मंजूर
दरम्यान विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांसह विविध खात्याचे मंत्री हे एकाच ठिकाणी भेटू शकतात. त्यामुळेच अनेकदा नागरिक आपल्या अनेक समस्या सोडवण्यासाठी विधिमंडळ परिसरात येत असतात. मात्र या लोकांना पोलिसांनी सुरक्षारक्षकांकडून अडवण्यात आल्याने अनेकदा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना घडत असतात. असाच प्रकार आज या महिलेने विधान भवन परिसरात केला.