Manipur Violence : मणिपुरात पोलिसही असुरक्षित; 400 लोकांच्या जमावाने ‘एसपी’ ऑफिस पेटवलं

Manipur Violence : मणिपुरात पोलिसही असुरक्षित; 400 लोकांच्या जमावाने ‘एसपी’ ऑफिस पेटवलं

Manipur Violence News : वर्षभरापासून मणिपुरात सुरू असलेला हिंसाचार अजूनही (Manipur Violence) थांबलेला नाही. या राज्यात हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र यश येताना दिसत नाही. आताही हिंसाचाराची मोठी घटना घडली आहे. संतप्त झालेल्या जमावाने चक्क पोलीस अधीक्षकांचं कार्यालयच पेटवून दिलं आहे. या घटनेचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या घटनेवरून स्पष्ट होत आहे की आता राज्यात पोलीस देखील सुरक्षित नाहीत. विशेष म्हणजे, या व्हिडिओत एक पोलीस कॉन्स्टेबलच जाळपोळ करताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याला तातडीने निलंबित करण्यात आले आहे. मणिपूरच्या चुरचांदपूर भागात ही घटना घडली आहे.

Manipur Violence : हिंसेची धग कायम! बंदूकधाऱ्यांच्या गोळीबारात पिता-पुत्र ठार; तणाव वाढला

चुराचांदपूर भागात याआधीही हिंसाचार उसळला होता. यावेळी परिस्थिती मात्र जास्तच चिघळली आहे. येथे दगडफेकही झाली आहे. संतप्त झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत.

मणिपुरातील हिंसाचाराचं कारण काय?

मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून हिंसाचार सुरू आहे. राज्यात दररोज कोणत्या ना कोणत्या घटना घडत आहेत. तेथे मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये हिंसक संघर्ष सुरू आहे. कुकी समाजाप्रमाणे मणिपूर राज्यातही एसटीचा दर्जा मिळावा, अशी मेईती समाजाची इच्छा आहे. आता या प्रकरणाचा वाद चांगलाच पेटला आहे. मेईतेईच्या या मागणीनंतर कुकी समाज त्याच्यावर चांगलाच संतापला असून, त्यावरून जोरदार वाद सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी तेथे महिलांच्या शोषणाचे प्रकरणही समोर आले होते, ज्याची बरीच चर्चा झाली होती आणि त्यावरून बराच वादही झाला होता.

Manipur : मणिपुरात आणखी काही दिवस इंटरनेट बंदच; ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय

मागील वर्षातील मे महिन्यात हिंसाचार उसळला होता. तेव्हापासून राज्य हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 180 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. राज्य आणि केंद्र सरकारडून राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. तरीदेखील हिंसाचाराच्या घटना घडतच आहेत. आता राज्यातील घटना नियंत्रणाबाहेर होत चालल्या असून याचा सर्वाधिक फटका निरपराध नागरिकांना बसत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube