Download App

एचडी देवेगौडांच्या नातवाचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल, एसआयटी स्थापन होताच देशातून फरार

प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आछहे. रेवन्ना यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • Written By: Last Updated:

Prajwal Revanna Viral Video : भारताचे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा (H. D. Deve Gowda) यांचे नातू प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेवन्ना यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल होत आहे. या अश्लील व्हिडीओ प्रकरणाच्या चौकशीसाठी आता विशेष तपास पथक (Special Investigation Team) तयार केले आहे.  दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री आणि प्रज्वल यांचे काका एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy यांनी पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

Pushpa 2: अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ चित्रपटाबद्दल अत्यंत मोठे अपडेट, चाहत्यांमध्ये उत्साह 

कर्नाटकच्या लोकसभा निवडणुकीच्या दोन दिवस आधी रेवन्ना यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर रविवारी त्यांच्या विरोधात एफआयआ दाखल करण्यात आला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या मागणीवरून शनिवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. तीन सदस्यीय एसआयटीचे प्रमुख एडीजी (सीआयडी) विजय कुमार सिंह असतील. SIT मध्ये सुमन डी. पेणेकर (DG, CID) आणि म्हैसूरच्य IPS सीमा लाटकर असणार आहेत. लकवरच तपास पूर्ण करण्याच्या सूचना एसआयटीला देण्यात आल्या आहेत.

Chhattisgarh Accident : बेमेतरा जिल्ह्यात ट्रक-पीकअपचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू 

रेवन्ना विरुद्ध आयपीसी कलम 354 अ (लैंगिक छळ), 354 डी (पाठलाग करणे), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

रेवन्ना यांच्या अश्लिल व्हिडिओमुळे कर्नाटकात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी कर्नाटक सरकारने एसआयटी स्थापन केल्यानंतर प्रज्वल रेवन्ना देश सोडून पळून गेल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

दुसरीकडे, या अश्लील व्हिडिओ-फोटोप्रकरणी पूर्णचंद्र तेजस्वी एमजी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नवीन गौडा आणि इतर अनेकांनी प्रज्वल रेवन्नाची बदनामी करण्यासाठी हे अश्लील व्हिडिओ शेअर केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

33 वर्षीय प्रज्वल रेवन्ना सध्या कर्नाटकातील हसनमधून खासदार आहेत. 2019 मध्ये त्यांनी पहिल्यांदा ही जागा जिंकली होती. यापूर्वी एचडी देवेगौडा यांनी 2004 ते 2019 पर्यंत या जागेवर सातत्याने विजय मिळवला होता.

follow us