President Draupadi Murmu on Kolkata Doctor Case : कोलकात्यातील आरजी कर मेडिकल कॉलेजमधील ट्रेनी डॉक्टर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात (Kolkata Doctor Case) आज पहिल्यांदाच देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी (Draupadi Murmu) प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेमुळे मी खूप निराश आणि भयभीत झाले आहे, असे मुर्मू म्हणाल्या. महिलांवरील अत्याचारावर त्यांनी दुःख व्यक्त केले. एकीकडे विद्यार्थी, डॉक्टर आणि नागरिक कोलकात्यात विरोध प्रदर्शन करत होते तर दुसरीकडे अपराधी मात्र मोकाट फिरत होते. बस आता खूप झालं आता काहीतरी करावंच लागणार आहे, असे मुर्मू पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या.
मुर्मू पुढे म्हणाल्या, कोणताही सभ्य समाज मुली आणि महिलांवरील अत्याचार परवानगी देणार नाही. समाजाला आता प्रामाणिक, निष्पक्ष आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. स्वतःला काही कठोर प्रश्न विचारण्याची आता वेळ आली आहे.
कोलकाता बलात्कार अन् खून प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपीने वापरलेली गाडी पोलीस आयुक्ताच्या नावावर
कोलकात्यातील आरजी कर मेडिकल हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज येथील ट्रेनी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले आहेत. अजूनही हे प्रकरण शांत झालेले नाही. या प्रकरणात ममता बॅनर्जी यांच्या सरकारने ज्या पद्धतीने कार्यवाही केली त्यावरून सरकारवर टीकेची झोड उठली आहे. देशात अनेक ठीकाणी या या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात आला.
कोलकाता घटनेच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीने बारा तासांच्या बंगाल बंदचे आवाहन केले होते. राज्यात या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. राज्य सरकारने हा बंद मोडून काढण्यासाठी राज्यातील भाजप नेत्यांची धरपकड केली. काही ठिकाणी कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचीही माहिती आहे. काही ठिकाणी गोळीबारही झाला. या बंदचा परिणाम दिसून आला. अनेक ठिकाणी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. दुकानेही पूर्ण बंद राहिली.
गृह मंत्रालयाचं मोठं पाऊल; दर दोन तासांनी पोलिसांना द्यावा लागणार रिपोर्ट, कोलकाता घटनेनंतर निर्णय