गृह मंत्रालयाचं मोठं पाऊल; दर दोन तासांनी पोलिसांना द्यावा लागणार रिपोर्ट, कोलकाता घटनेनंतर निर्णय
Kolkata Murder Case : कोलकातामध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या आणि खूनाच्या घटनेनंतर जगभरातून संताप व्यक्त होत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Amit Shah) या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील सर्व पोलिस दलांना निर्देश जारी केलेल आहेत.
Video : रशियात भूकंप! रिश्टर स्केलवर भूकंपाची 7 इतकी तीव्रता; थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल
केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार, आता पोलिसांना दर दोन तासाला आपल्या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेचा एक रिपोर्ट गृह मंत्रालयाला पाठवाला लागणार आहे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना हे बंधनकारक असेल.
कायदा आणि सुव्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलंल आहे. या आदेशामध्ये सततच्या अपडेट्सवर भर देण्यात आलेला असून सर्व पोलिस दलांना ई-मेल, फॅक्स किंवा व्हॉट्सअपद्वारे मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला माहिती पुरवावी लागेल.
Video : रशियात भूकंप! रिश्टर स्केलवर भूकंपाची 7 इतकी तीव्रता; थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल
देशात कुठे काय घडतंय आणि त्यावर त्वरित पावले कशी उचलता येतील, यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. कोलकाता येथील संताप आणणाऱ्या घटनेनंतर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने असे आदेश काढले आहेत.