‘न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार’, SC च्या आवाहनानंतरही बंगालच्या ज्युनियर डॉक्टरांची घोषणा

‘न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार’, SC च्या आवाहनानंतरही बंगालच्या ज्युनियर डॉक्टरांची घोषणा

Kolkata Murder Case: कोलकाता येथील आर. जी. कर हॉस्पिटलमधी (R. G. Kar Hospital) कनिष्ठ महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ दिल्लीतील विविध रुग्णालयांतील डॉक्टरांनी सुरू केलेला संप मागे घेण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने अपील केल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. मात्र, सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) संप मागे घेण्याचे आवाहन करूनही ज्युनियर डॉक्टर्स फ्रंट ऑफ बंगालने आंदोलन मागे घेतला नाही.

Mood of the Nation survey : आज निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? 

आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ज्युनियर डॉक्टरवर हल्ला आणि खून झाल्यामुळे देशभरात निषेध झाला. 12 ऑगस्ट रोजी, RDAs ने देशव्यापी निषेध सुरू केला, बाह्यरुग्ण विभाग (OPD) सेवा थांबवल्या होत्या. केवळ आपत्कालीन सेवा नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने आज आंदोलक डॉक्टरांना कामावर परत येण्यास सांगितले होते.

काय म्हणाले होते सरन्यायाधीश?
कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी निवासी डॉक्टरांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. चंद्रचूड म्हणाले की, डॉक्टरांसह आरोग्य सेवेशी संबंधितांना आपल्या कामावर परत यावे. ते पुन्हा ड्युटीवर आल्यावर त्यांच्याविरुध्द कारवाई न करण्याबाबत सांगेल, असं सरन्यायाधीश म्हणाले होते.

त्यानुसार फेमाने संप मागे घेण्याची घोषणा केली. तर दिल्ली एम्सच्या डॉक्टरांनी गुरुवारी संध्याकाळी RG कर घटनेच्या निषेधार्थ त्यांचा 11 दिवसांचा संप संपवण्याची घोषणा केली.

मात्र, गेल्या १४ दिवसांपासून संपावर असलेल्या राज्यातील ज्युनियर डॉक्टरांनी आरजी कार हॉस्पिटलमधील आपल्या सहकारी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ न्याय मिळत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे.

राज्य सरकारने केएमसीएचच्या तीन अधिकाऱ्यांची बदली करून आणि आरजी कार हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची कलकत्ता मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (सीएनएमसी) नियुक्ती रद्द करूनही आंदोलक डॉक्टरांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले.

काय म्हणाले आंदोलक डॉक्टर?
आमच्या काही मागण्या पूर्ण झाल्या तरी आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे एका आंदोलक डॉक्टरांनी सांगितले. कारण आमच्या बहिणीला न्याय मिळावा ही मुख्य मागणी अजूनही प्रलंबित असल्याचं आंदोलक डॉक्टरने सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube