Vice President Jagdeep Dhankhar Resign : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी (President Droupadi Murmu) उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा स्वीकारला. सोमवारी संध्याकाळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी (Jagdeep Dhankhar Resign) प्रकृतीच्या कारणास्तव राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे राजीनामा पाठवला होता. यानंतर राजकीय तापमान वाढले होते.
राजीनाम्यामागे कोणती कारणे?
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. कालच धनखड यांनी राष्ट्रपती मुर्मू यांना पत्र पाठवून आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. त्यांनी राजीनाम्यामागे आरोग्यविषयक कारणे सांगितली होती. मंगळवारी राज्यसभेला गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेची (दि. 22 जुलै) माहिती देण्यात आली. जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत धनखड यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले की, ‘जगदीप धनखड यांना भारताच्या उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मी त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो.’
मोठी बातमी! आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर दोषी; नेमकं प्रकरण काय?
संपूर्ण दिवस राज्यसभेत सक्रिय
सोमवारी संपूर्ण दिवस धनखड राज्यसभेत सक्रिय होते. सकाळी त्यांनी विरोधकांना संसदेला संवाद आणि चर्चेसाठी सकारात्मक व्यासपीठ बनवण्याचा सल्ला दिला. दुपारी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्तावाची सूचना स्वीकारताना त्यांनी संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट केली. न्यायमूर्ती शेखर यादव यांच्याविरुद्ध सादर केलेल्या महाभियोग सूचनेतील खासदाराच्या दुहेरी स्वाक्षरीची चौकशी करण्याची घोषणाही त्यांनी केली.
रेल्वे तिकीट मिळणार ईएमआयवर! रेल्वे विभागाचा मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर
उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा
उपराष्ट्रपती धनखर यांनी लिहिले की, डॉक्टरांच्या सल्ल्याला आणि आरोग्याला प्राधान्य देत, मी संविधानाच्या कलम 67 (अ) अंतर्गत तात्काळ उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे. धनखर यांनी ऑगस्ट 2022 मध्ये पदभार स्वीकारला होता. व्यवसायाने वकील असलेले धनखर उपराष्ट्रपती म्हणून निवडून येण्यापूर्वी पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. धनखर यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळ सदस्य तसेच सर्व खासदारांचे आभार मानले.