Download App

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत चूक, एसपीसह 7 पोलीस निलंबित

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पंजाब सरकारने एका एसपी, दोन डीएसपींसह 7 जणांना निलंबित केले आहे. 5 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान फिरोजपूर (Ferozepur rally) येथे आयोजित सभेत सहभागी होण्यासाठी जात असताना शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरने रस्ता अडवला होता. यामुळे पंतप्रधानांचा ताफा काही वेळ थांबला होता. आता या प्रकरणी फिरोजपूरचे तत्कालीन एसपी गुरविंदर सिंग सांगा, डीएसपी परसन सिंग, डीएसपी जगदीश कुमार, इन्स्पेक्टर तेजिंदर सिंग, बलविंदर सिंग, जसवंत सिंग आणि एएसआय राकेश कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे.

पंजाबच्या गृह विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, गुरविंदर सिंग सांगा सध्या भटिंडा जिल्ह्यात एसपी म्हणून तैनात होते. त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. 5 जानेवारी 2022 रोजी निदर्शकांनी केलेल्या नाकेबंदीमुळे पंतप्रधान मोदींचा ताफा फिरोजपूरमधील उड्डाणपुलावर अडकला होता. त्यानंतर ते रॅलीसह कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित न राहता पंजाबहून परतले होते.

Lok Sabha Election : ..तर भाजपाचे 340 खासदार निवडून येतील; बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं लॉजिक

पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरक्षेत हलगर्जीपणामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. निलंबनाच्या आदेशानुसार, 18 ऑक्टोबर 2023 रोजी घडलेल्या घटनेचा अहवाल पोलिस महासंचालकांनी (डीजीपी) सादर केला होता. यात म्हटले की गुरविंदर सिंग सांगा यांनी त्यांचे कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडले नाही.

शेतकरी आंदोलकांनी केलेल्या नाकाबंदीमुळे पंतप्रधानांचा ताफा सुमारे 20 मिनिटे उड्डाणपुलावरच अडकून राहिला होता. या हलगर्जीपणाबद्दल भाजप नेत्यांनी तत्कालीन चरणजीत सिंह चन्नी सरकारला लक्ष्य केले होते. तर पंतप्रधानांच्या प्रवासात शेवटच्या क्षणी बदल झाल्याचे काँग्रेसने म्हटले होते.

Mann ki Baat : डिजिटल पेमेंट करा अन् फोटो पाठवा! PM मोदींनी देशवासियांना दिला टास्क

संबंधित आदेशात सर्वच्या सर्व सातही पोलीस कर्मचाऱ्यांना पंजाब सिव्हिल सेवा नियम 1970 च्या नियम 8 नुसार कारवाई सामना करावा लागेल. या नियमांतर्गत पदोन्नती रोखण्यापासून ते सेवेतून बडतर्फे करेपर्यंत शिक्षा होऊ शकते.

follow us