Sanjay Raut : राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणात काय होणार? मोदींचं नाव घेत राऊताचं भाकित

Sanjay Raut : राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणात काय होणार? मोदींचं नाव घेत राऊताचं भाकित

Sanjay Raut : देशातील पाच राज्यांत निवडणुकांची (Assembly Elections 2023) रणधुमाळी सुरू आहे. आता निकालांची प्रतिक्षा आहे. या राज्यात कोण बाजी मारणार याचे उत्तर 3 डिसेंबरला मिळेल. मात्र, त्याआधीच दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि पीएम मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगाणा, छत्तीसगडमध्ये मोदींची जादू चालणार नाही. हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ झालं आहे. मिझोराममध्ये प्रादेशिक नॅशनल फ्रंट व अन्य पक्षांत लढाई आहे. येथे कोणत्याही परिस्थितीत भाजपाचा विजय होणार नाही, असं भाकित राऊत यांनी केलं आहे. राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी, भाजपवर घणाघाती टीका केली.

राऊत म्हणाले, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजपाचा पराभव होणार आहे. राजस्थानात अशोक गेहलोत जादूगर आहेत. गेहलोतांनी थेट पंतप्रधानांना आव्हान दिलं आहे. या राज्यात अटीतटीची लढाई होणार हे नक्की असून यात काँग्रेस बाजी मारणार यात शंका नाही. तेलंगणात तर भाजप स्पर्धेतही नाही. येथे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती आणि एमआयएमला मतदान करण्यासाठी भाजपाने कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संदेश दिला आहे. पण काँग्रेसला मतदान करू नका असंही सांगितलं आहे. पण ते काहीही असलं तरी तेलंगणाता काँग्रेसने मुसंडी मारली असून चांगले परिणाम येतील, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

Sanjay Raut : हे सरकार पराभवाच्या भीतीने घाबरलयं; नॅशनल हेराल्डवरून राऊतांची टीका

भाजपाची मान्यता रद्द करा 

मध्य प्रदेश आणि त्यानंतर तेलंगाणातील प्रचारसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भाजप सत्तेत आल्यास अयोध्येत मोफत प्रभू श्रीरामाचे दर्शन घडवू असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती. शहा यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचेही सांगितले गेले होते. संजय राऊत यांनी पुन्हा यावर भाष्य केलं आहे. प्रभू श्रीरामाचे मोफत दर्शन हा आचारसंहितेचा भंग आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) भाजपला नोटीस पाठवत पक्षाची मान्यता रद्द केली पाहिजे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. प्रभू श्रीरामाचे मोफत दर्शन घडवण्यापेक्षा काश्मीरी पंडितांची घरवापसी केली असती तर हिंदुत्वाच्या नावावर मते मागण्याचा भाजपला अधिकार राहिला असता, असेही राऊत यांनी भाजपाला सुनावले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube