Mann ki Baat : डिजिटल पेमेंट करा अन् फोटो पाठवा! PM मोदींनी देशवासियांना दिला टास्क
Mann ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मन की बात (Mann ki Baat) या कार्यक्रमात देशवासियांना खास आवाहन केलं. नागरिकांनी आता देशात तयार केलेल्या वस्तू जास्तीत जास्त वापराव्यात. ऑनलाइन पद्धतीनेच व्यवहारांना प्राधान्य द्यावे. परदेशात लग्न सोहळे आयोजित करण्याऐवजी देशातच करा. यामुळे देशातील गरीब लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यांची मदत होईल आणि देशाचा पैसा देशातच राहिल, असे पीएम मोदी (PM Modi) म्हणाले. यावेळी त्यांनी आजच्या संविधान दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात मोदींनी नागरिकांना एक टास्क दिला. महिनाभरात लोकांनी आपले आर्थिक व्यवहार युपीआय किंवा अन्य डिजीटल माध्यमांतून करावेत. महिना झाल्यानंतर आलेले अनुभव आणि काही फोटो पाठवा, असे आवाहन मोदींनी केले.
Mann ki Baat : आज 100 वा भाग; दिल्लीपासून थेट UN पर्यंत आवाज पोहोचणार
यावेळी मोदींनी संविधान दिनानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या संविधानाचा स्वीकार करण्यात आला होता. देशातील नागरिकांना मी संविधान दिनानिमित्त शुभेच्छा देतो. आपण सगळ्यांनी मिळून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करू या असे मोदी म्हणाले. वोकल फॉर लोकल (Vocal For Local) अभियानाला फक्त सण आणि उत्सवांपर्यंतच मर्यादित ठेऊ नका. विवाह समारंभासारख्या मोठ्या कार्यक्रमात जास्तीत जास्त प्रमाणात स्थानिक पातळीवरील वस्तू वापरात आणव्यात. बाहेर देशात जाऊन लग्न सोहळे आयोजित करण्यापेक्षा देशातच आयोजित करावेत जेणेकरून रोजगाराच्या आणखी संधी उपलब्ध होतील.
मागील सण उत्सवांच्या काळात देशभरात चार लाख कोटींपेक्षा जास्त रुपयांची उलाढाल झाली. या दरम्यान भारतात तयार करण्यात आलेल्या वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा कल दिसून आला. आता तर लोकांत इतका बदल झाला आहे की लहान मुलं सुद्धा वस्तू खरेदी करताना आधी त्यावर मेड इन इंडिया हे शब्ह लिहिले आहेत का हे तपासतात.
Mann ki Baat : पंतप्रधान मोदींनी सांगितलं तृणधान्याचं महत्व, पद्म पुरस्कारार्थींचं अभिनंदन
डिजिटल इंडियाचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘दिवाळीनिमित्त रोख पैसे देऊन वस्तू खरेदी करण्याचा ट्रेंड हळूहळू कमी होत आहे. हे सलग दुसरे वर्ष आहे. आता लोक अधिकाधिक डिजिटल पेमेंटकडे वळले आहेत. हे देखील खूप उत्साह वाढविणारे आहे. बुद्धिमत्ता, कल्पना आणि नवनिर्मिती ही आज भारतीय तरुणांची ओळख आहे. तंत्रज्ञानाच्या जोडीने त्यांच्या बुद्धिमत्तेत सतत वाढ व्हायला हवी, ही देशाची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची प्रगती आहे.