Download App

कॉंग्रेस बहुमताच्या दिशेने वाटचाल करतांना प्रियांका गांधींनी केली भगवान हनुमानाची पूजा

Priyanka Gandhi in Jakhu Hanuman Temple : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (karnataka assembly election) सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस (Congress) बहुमताचा आकडा पार करताना दिसत आहे. त्याचवेळी, गुरुवारी निकालापूर्वी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) शिमला येथील त्यांच्या खाजगी निवासस्थानी पोहोचल्या होत्या. हिमाचलमधील प्रियांका गांधी यांचे फोटो समोर येत आहेत. ज्यात त्या हनुमान मंदिरात पूजा करताना दिसत आहेत. काँग्रेस आघाडीवर असतांना प्रियांका यांनी शिमल्यातील प्रसिद्ध जाखू हनुमान मंदिरात (Jakhu Hanuman Temple) जाऊन हनुमानाच्या चरणी लीन झाल्या आहेत.

कर्नाटक निवडणुकीत मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली होती. या निवडणुकीत काँग्रेसला मोठी आघाडी मिळाली आहे. तर भाजपला अनेक ठिकाणी परभवाला सामोरं जावं लागलं. भाजप सरकारमधील अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागल्यानं भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीपासून कॉंग्रेसची बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू असतांनाच प्रियांका गांधींनी जाखू हनुमान मंदिरात जाऊन पूजा केली. हनुमानाचं दर्शन घेतलं. कॉंग्रेसने प्रियांका गांधी यांचा हनुमान मंदिरातील फोटो आणि व्हिडिओ ट्वीट केला आहे. या व्हिडिओत दिसतं की, प्रियांका गांधी हनुमान मंदिरात गेल्या असून त्यांनी बजरंगबल्लीचं दर्शन घेतलं. भगवतांच्या चरणी लीन होऊन त्यांनी देशाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

सोनिया गांधी शिमला येथे पोहोचल्या
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीही शुक्रवारी संध्याकाळी शिमला येथे पोहोचल्या आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्यासह अन्य नेत्यांनी चंदीगड विमानतळावर सोनिया गांधींचे स्वागत केले. सोनिया गांधी चंदीगडहून रस्त्याने शिमला येथे पोहोचल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी लवकरच प्रियांका गांधी यांच्या छाबरा येथील खाजगी निवासस्थानीही येऊ शकतात.

काँग्रेसमध्ये जल्लोष
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मतमोजणीपूर्वी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात ढोल-ताशे वाजवून जल्लोष केला जात आहे. दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर जल्लोष सुरू झाला आहे. एआयसीसी मुख्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते मिठाई वाटताना दिसले. दरम्यान, बेंगळुरू पक्ष कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला. काँग्रेसचे अनेक नेतेही मोठ्या विजयाचा दावा करत आहेत.

ट्रेंडमध्ये काँग्रेस पुढे असल्याचे पाहून सचिन पायलट म्हणाले, “आम्ही कर्नाटकात मोठ्या संख्येने जिंकत आहोत. जनतेने सरकारला 40% कमिशन नाकारले आहे. खूप प्रचार झाला पण आम्ही मुद्द्यांवर ठाम होतो त्यामुळेच जनतेने आम्हाला बहुमत दिले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याने पक्षाने आपल्या सर्व आमदारांना आज बेंगळुरूला पोहोचण्यास सांगितले आहे. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांना बंगळुरूला नेण्यासाठी राज्यातील दुर्गम भागातही विशेष व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी निरीक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, आता कर्नाटकात कोण सत्तारूढ होणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us