Download App

Priyanka Gandhi यांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रींगप्रकरणी ईडी चार्जशीटमध्ये आलं नाव

  • Written By: Last Updated:

Priyanka Gandhi : मनी लॉंडरिंग प्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण सक्तवसुली संचालनालयाने (ED) या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये पहिल्यांदाच प्रियंका गांधी यांच्या नावाचा देखील उल्लेख केला. यामध्ये त्यांचं नाव आरोपी म्हणून नोंदवण्यात आलेले नाही. मात्र संबंधित प्रकरणातील जमीन खरेदी करणाऱ्या आरोपीशी त्यांचा संबंध असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आलं आहे. त्याचबरोबर या चार्जशीटमध्ये प्रियांका गांधी यांच्यासह त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या नावाचा देखील समावेश आहे.

Nana Patekar: नानांची नाना रुपं, ‘ओले आले’ मध्ये रंगून गेले नाना पाटेकर

ईडी चार्जशीटनुसार संजय भंडारी यांचा कथित सहकारी सीसी थंम्पी यांने 2005 ते 2008 या दरम्यान हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यातील आमिपुर गावामध्ये तब्बल 486 एकर जमीन दिल्लीतील रिअल इस्टेट एजंट पाहावा यांच्यामार्फत खरेदी केली होती. त्यानंतर प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी 2005 ते 2006 मध्ये येथील पाहावा यांच्याकडून 334 कानाल म्हणजेच 40.8 एकर जमिनीचे तीन भूखंड खरेदी केले.

Bachhu Kadu : पवारांना निमंत्रण अन् बच्चू कडूंचा मविआमध्ये जाण्यास ग्रीन सिग्नल? पाहा फोटो

डिसेंबर 2010 मध्ये तीच जमीन त्यांनी पाहावा यांनाच पुन्हा विकल्याचं समोर आलं होतं. या खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये पाहावा यांना काही रोख रक्कम देण्यात आली होती. मात्र वाड्रा यांनी पहावा यांना व्यवहारातील पूर्ण पैसे दिले नसल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या दरम्यान कथित अघोषित संपत्ती बाळगणारे संजय भंडारी हे 2016 मध्ये इंग्लंडमध्ये निघून गेलेले आहेत. त्यांच्या विरोधात मनी लॉन्ड्री आणि कर चोरीच्या आरोपांची चौकशी सुरू असल्याने ब्रिटन सरकारने ईडीने केलेल्या मागणीनुसार जानेवारीमध्ये त्यांना भारतात पाठवण्यासाठी मंजुरी दिली आहे.

Congress पक्षाला निधीची चणचण? रॅलीतील प्रत्येक खुर्चीला लावले क्युआर कोड

तर भंडारी यांचा सहकारी असलेल्या थंम्पी याला जानेवारी 2020 मध्ये अटक करण्यात आली होती. तसेच ईडीच्या आरोपांनुसार थंम्पी हा वाड्रा यांचा देखील जवळचा सहकारी असल्याचे सांगण्यात आलं होतं. सध्या थंम्पी हा जामिनावरती तुरुंगातून बाहेर आलेला आहे. तर भंडारी यांच्याकडे विविध प्रकारची अघोषित परदेशी कमाई आणि संपत्ती आहे. ज्यामध्ये 12 ब्रायनस्टन स्क्वायर, लंडन आणि 6 ग्रोसवेनर हिल कोर्ट येथील संपत्तीचा समावेश आहे.

follow us