Nana Patekar: पाटेकरांची ना-ना रुपं, ‘ओले आले’ मध्ये रंगून गेले नाना

Nana Patekar: पाटेकरांची ना-ना रुपं, ‘ओले आले’ मध्ये रंगून गेले नाना

Nana Patekar: ‘वेश असावा बावळा, परि अंतरी नाना कळा,’ हे वचन तंतोतंत लागू पडतं ते म्हणजे विविधरंगी कलागुणसंपन्न नाना पाटेकर (Nana Patekar) या बहुरूपी व्यक्त्मित्त्वाला! कलासक्त नानांनी आजवर असंख्य नाटकं आणि चित्रपटांमधून आपल्यातलं वेगळंपण कायम सिद्ध केलं आहे. (Marathi Movie) पण.. एखादे नाठाळ… खोडसाळ… प्रेमळ बाबा बहुधा प्रथमच आपण नानांच्या स्वरूपात पाहतोय. ‘ओले आले’ (Ole Aale Movie) या चित्रपटातून नानांचे आणखी काही कलारंग आपल्याला पाहायला मिळणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)


नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच ५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘ओले आले’ हा चित्रपट नाना पाटेकरांच्या फॅन्ससाठी एक सरप्राईज पॅकेज असणार आहे हे नक्की. मुलाच्या मागे-मागे फिरणारे.. खोड्या काढणारे.. जीवापाड प्रेम करणारे.. आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला शिकवणारे नाना सध्या सोशल मीडियावर (social media) धुमाकूळ घालत आहेत.

शिस्तप्रिय बाबांच्या व्यक्तिरेखेच्या अगदी उलट अशी ही नानांची भूमिका आपल्याला पोट धरून हसायला लावतेय. आजवर नानांच्या विविध भूमिका आपण पाहिल्या आहेत. त्यांची प्रत्येक भूमिका आपल्याला काही ना काही तरी देऊनच जाते. अशीच ‘ओले आले’ चित्रपटातली नानांची भूमिका ”जगणं समृद्ध करायला शिकवणारी आहे” असं ते सांगतात.

Tamannaah Bhatia: तमन्ना भाटिया ठरली 2023 साठी गेम-चेंजिंग OTT अभिनेत्री

चला जगूया, हसूया, फिरूया म्हणणारे नाना पाटेकर कोकोनट मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘ओले आले’ या चित्रपटाद्वारे येत्या ५ जानेवारीपासून जवळच्या चित्रपटगृहात आपल्याला भेटणार आहेत. ‘ओले आले’ या सिनेमाच्या आधी सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव यांचा झिम्मा-2 हा सिनेमा देखील रिलीज झाला आहे. ‘झिम्मा-2’ हा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या सिनेमात सुहास जोशी, रिंकू राजगुरू, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर आणि शिवानी सुर्वे हे कलाकार देखील मुख्य भूमिका साकारली आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज