Download App

राज्यात राजकीय घडामोडींना वेग, दिल्लीत प्रियंका गांधींनी घेतली अमित शाहांची भेट, नेमकं कारण काय?

Priyanka Gandhi Meets Amit Shah : उद्या महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शपथ घेणार आहे. त्यामुळे राज्यात

  • Written By: Last Updated:

Priyanka Gandhi Meets Amit Shah : उद्या महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शपथ घेणार आहे. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नव्या सरकारमध्ये सहभागी होणार का? याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस (Congress) सरचिटणीस आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी वड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

माहितीनुसार, प्रियंका गांधी यांनी वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी या मागणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान प्रियंका गांधी यांनी गृहमंत्र्यांना आपत्तीग्रस्त लोकांना त्वरित मदत देण्याची आणि परिसरात आवश्यक पायाभूत सुविधा पुनर्संचयित करण्याची विनंती केली आहे.

यावेळी प्रियंका गांधी यांनी अमित शाह यांना आपत्तीचे गांभीर्य लक्षात दाखवून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात मोठा परिसर बाधित झाला असून अनेकांचा मृत्यू झाला आहे. काही कुटुंबे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.

यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आपत्तीग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर, केंद्राकडून मदत मिळू शकेल, अशी आशा लोकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र चार महिने उलटूनही केंद्राकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर केंद्राकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी यावेळी प्रियंका गांधी यांनी केली.

तर काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल (KC Venugopal) म्हणाले की, गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना सांगितले आहे की, आपत्तीग्रस्तांना मदत देण्यासाठी आतापर्यंत काय केले गेले आणि यापुढे काय करता येईल याची माहिती गुरुवारी संध्याकाळपर्यंत त्यांना उपलब्ध करून दिली जाईल.

Jammu and Kashmir : मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला

केरळच्या खासदारांनी पीडितांना त्यांची घरे, शाळा आणि व्यवसाय पुनर्बांधणीसाठी मदत करण्यासाठी निधी लवकरात लवकर सोडण्याची केंद्र सरकारला विनंती केली आहे.

follow us