Punjab News : पंजाब सरकार आणि राज्यपाल बनवारीलाल पुरोहित (Banwari Lal Purohit) यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभुमीवर पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आज राजीनामा दिला आहे. माझ्या वैयक्तिक कारणांमुळे आणि इतर काही कारणांमुळे मी पंजाबचे (Punjab News) राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या प्रशासक पदाचा राजीनामा देत आहे असे स्पष्ट करत पुरोहित यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा पाठवला आहे. बनवारीलाल पुरोहित 2021 मध्ये पंजाबचे 36 वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती. या सोहळ्यासाठी हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय, माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर उपस्थित होते. पंजाबआधी 2017 ते 2021 पर्यंत तामिळनाडूचे राज्यपाल होते त्याआधी आसामचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. पुरोहित हे तीन वेळा नागपुरातून खासदार राहिले आहेत.
Punjab : खलिस्तानी अतिरेकी पन्नूकडून CM मान यांना जीवे मारण्याची धमकी; यंत्रणा अलर्ट
मागील काही दिवसांपासून राज्यपाल आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यात वाद सुरू होता. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री मान म्हणाले होते की राज्यपाल आम्हाला त्रास देत आहेत. लोकशाहीतून निवडून आलेले शासन चालते पण काही लोकांना निवडक राजवटीची सवय झाली आहे. याआधीही भगवंत मान यांनी राज्यपालांवर टीका केली होती. दोघांत इतके मतभेद होते की पंजाबचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयात गेले होते.
पंजाब आणि दिल्लीत आम आदमी पार्टीचे सरकार आहे. दोन्ही सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार यांच्यात कायमच वाद सुरू आहेत. कथित मद्य घोटाळा प्रकरणात चौकशी करण्यासाठी ईडीने पाचव्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना नोटीस बजावली होती. पहिल्या चार नोटिसींकडे दुर्लक्ष करत केजरीवाल चौकशीसाठी हजर राहिले नव्हते.
महाविकास आघाडीला मिळणार चौथा पार्टनर? : अरविंद केजरीवाल मुंबई दौऱ्यावर