Download App

Rahul Gandhi यांच्या व्यसनी तरुणावरच्या टिप्पणीवर भडकले पंतप्रधान !

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi : काँग्रेस खासदार आणि माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी उत्तर प्रदेश मध्ये आल्यानंतर एका व्यसने तरुणाबद्दल केलेल्या एका विधानामुळे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यावर टीका केली. मोदी म्हणाले की काशीमध्ये येऊन काँग्रेसचे युवराज येथील तरुणांना व्यसनी म्हणत आहेत.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करत आहेत. ही यात्रा मणिपूर पासून सुरू झाली असून सध्या ते उत्तर प्रदेशमध्ये आहेत. यादरम्यान त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. ते म्हटले होते की, मी वाराणसी येथे गेलो होतो. तिथे मी बघितलं की, रात्री बँड वाजत होता. लोक दारू पिऊन रस्त्यावर पडलेले होते. उत्तर प्रदेशचे भविष्य रात्री दारू पिऊन नाचत होतं. दुसरीकडे राम मंदिर झालं आहे. जिथे तुम्हाला मोदी, अंबानी आणि आदानी त्यांच्यासह भारतातील सगळे अरबपती दिसतील. मात्र एकही मागासलेला दलित दिसणार नाही. कारण बंधू-भगिनींनो तुमची जागा रस्त्यावर भीक मागण्याची आहे. त्यांची पैसा मोजण्याची.

समावेश झाला, बैठका झाल्या पण जागावाटपाचं काय? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं नियोजन

त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका करत म्हटलं की, काँग्रेसचे युवराज म्हणत आहेत. उत्तर प्रदेशचे माझ्या काशीतील तरुण व्यसनी आहेत. ही कसली भाषा आहे? मोदींवर टीका करत करत यांचे दोन दशकं गेली. आता मात्र ते ईश्वररूपी असलेल्या जनतेवर देखील टीका करत आहेत. हे लोक आता उत्तर प्रदेशमधील तरुणांवर आपला राग काढत आहेत.

…आता कमळावर निवडून येणारा खासदार हवा; रामटेक अन् नाशिकमध्ये भाजपकडून शिंदेंची कोंडी

दुसरीकडे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना झारखंड हायकोर्टाचा मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधीविरोधात रांचीमध्ये खटला चालवला जाणार आहे. 2018 मध्ये राहुल गांधी यांनी भाजपचे तत्कालीन अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी एमपी-एमएलए न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले होते. या समन्सविरोधात राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. राहुल गांधी यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. राहुल गांधी यांच्या विरोधातील खटला रांचीच्या कनिष्ठ न्यायालयात सुरू राहणार आहे.

follow us