Download App

अदानींच्या चॅनेलवरून गुंतवणुकीचा सल्ला, खोटे एक्झिट पोल अन् गडगडलेलं मार्केट; राहुल गांधींचे मोदी-शाहंवर आरोप

Rahul Gandhi यांनी शेअर बाजारात गुंतवणुक करण्याचा सल्ला देणाऱ्या मोदी आणि शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला

Rahul Gandhi on Modi and Shah for Investment Advice in share market : देशात लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपसह एनडीएला धक्का तर कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीसाठी अनपेक्षित असं यश मिळालं आहे. मात्र याचा मोठा परिणाम शेअर बाजारावर ( share market ) आणि गुंतवणुकीवर झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावरून आता शेअर बाजारात गुंतवणुक करण्याचा सल्ला देणाऱ्या मोदी आणि शाह ( Modi and Shah ) यांच्यावर राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी जोरदार निशाणा साधला आहे. मोदी आणि शाह यांनी हा सल्ला कुणाच्या हितासाठी दिला? ज्याने सर्वसामान्य गुंतवणुकदारांचं नुकसान झालं. असा सवाल यावेळी राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. आज ( 6 जून) राहुल यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये ते बोलत होते.

काय म्हणाले राहुल गांधी?

निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी देखील शेअर मार्केटवर भाष्य केलं. मोदी तीन ते चार वेळा म्हणाले की, शेअर मार्केट उच्चांक गाठणार आहे. तर अमित शाहा यांनी थेट 4 जूनला शेअर बाजार उच्चांक गाठेल त्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी असा सल्ला दिला.

शरद पवार जिथे असतात तिथे स्ट्राईक रेट जास्त असतो; जयंत पाटलांचं विधान

त्याचबरोबर माध्यमांनी देखील खोटे एक्झिट पोल जाहीर केले. त्यामुळे तीन जूनला शेअर बाजाराने उसळी घेतली. मात्र 4 जूनला परिस्थिती प्रचंड बदलली. सत्ताधारी भाजपच्या 220 जागा येतील याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना होती. तरी देखील त्यांनी शेअर बाजार उच्चांक गाठेल असे खोटे सल्ले दिले. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात शेअर बाजारात गुंतवणूक झाली. परदेशी गुंतवणूक देखील झाली. मात्र ज्या दिवशी निकाल जाहीर झाले त्यादिवशी गुंतवणूकदारांचं तब्बल 30 लाख कोटींचं नुकसान झालं.

नवीन ट्विस्ट? राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, ‘RSS मोदींना पर्याय शोधतेय’

त्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीचा सल्ला का दिला? ज्या चॅनेलच्या मुलाखतीमध्ये मोदी आणि शाह यांनी हा सल्ला दिला ते चॅनेल अदानी यांचेच का होते? त्यामुळे हा भारतातील शेअर बाजारातील सर्वात मोठा घोटाळा आहे. त्यानंतर खोटे एक्झिट पोल जाहीर झाले. त्यामुळे मोदी शाह यांचा गुंतवणुकीचा सल्ला आणि आदाने तसेच परकीय गुंतवणूकदार यांच्या या सर्व प्रकरणांमध्ये नेमका संबंध काय? याची चौकशी झाली पाहिजे देशासमोर सत्य आलं पाहिजे अशी मागणी यावेळी राहुल गांधी यांनी केली आहे.

काय म्हणाले होते अमित शाह?

एका मुलाखतीदरम्यान अमित शाह म्हणाले होते, शेअर बाजारात होणारी घसरण आणि लोकसभा निवडणुकीचा काहीच संबंध नाही. 4 जून नंतर शेअर बाजारात तेजी दिसून येणार आहे. शेअर बाजार कोसळण्याची ही पहिलीच वेळ नाही याआधी शेअर बाजार 16 वेळा कोसळला आहे. यामुळे याचा आणि निवडणुकीशी संबंध जोडला जाऊ नये. गुंतवणूकदारांनी 4 जूनपूर्वी खरेदी करा, कारण त्यानंतर बाजार वाढणारच आहे, असे भाकीतही यावेळी अमित शाह यांनी केलं होतं.

follow us

वेब स्टोरीज