Rahul Gandhi Press Conference : मोदी-अदानी यांचे संबंध काय? ते २० हजार कोटी कोणाचे?

Rahul Gandhi Press Conference : अदानी ग्रुपच्या शेल कंपनी आहे. त्यांच्या कंपनीमध्ये 20 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक कोणाची आहे? असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये विचारला आहे. सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुिनावली होती. त्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. संसदेच्या नियमानुसार शिक्षापात्र […]

rahul gandhi press conference

rahul gandhi press conference

Rahul Gandhi Press Conference : अदानी ग्रुपच्या शेल कंपनी आहे. त्यांच्या कंपनीमध्ये 20 हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक कोणाची आहे? असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये विचारला आहे.

सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुिनावली होती. त्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. संसदेच्या नियमानुसार शिक्षापात्र खासदाराला आपले पद गमवावे लागते. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने त्यासाठीची अधिसूचना काल दुपारी जाहीर केली. त्यानंतर देशभरात काँगेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली. याच मुद्दयांवर आज राहुल गांधी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे संबंध काय?

याच पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि गौतम अडाणी यांचे नाते काय असा प्रश्न विचारला. हाच प्रश्न याआधीही त्यांनी लोकसभेत विचारला होता. राहुल गांधी म्हणाले की लोकसभेत मी पुराव्यासहित मी मोदी आणि अदानी यांचे नाते काय ? असा प्रश्न विचारला होता. अदानी आणि मोदी याचे संबंध जुने आहेत. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्याचे संबंध आहेत.

अपात्र ठरवा, तुरुंगात टाका प्रश्न विचारणारचं; पत्रकार परिषदेत राहुल गांधींचा रूद्रावतार

प्रश्न विचारणं थांबवणार नाही

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की देशात लोकशाहीवर हल्ला केला जात आहे. संसदेत मंत्री माझ्याविरुद्ध खोटे बोलले. त्याचवेळी माझी भाषणे संसदेतून काढली गेली. पण मी प्रश्न विचारणे थांबवणार नाही. मी घाबरणार नाही. माझी खासदारकी रद्द करून मला थांबवू शकत नाही. मी भारताच्या लोकशाहीसाठी लढत आहे आणि लढत राहीन.

काँग्रेसशासित राज्यात अदानींचा पैसा

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल देखील उपस्थित होते. अदानी यांची या दोन राज्यात देखील गुंतवणूक आहे, त्यावर देखील पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आले. त्यावर राहुल गांधी म्हणाले की असे मुद्दे चर्चेत आणून मूळ मुद्दा भरकटवला जाऊ शकत नाही.

मूळ प्रश्न असा आहे की अदानी यांच्या कंपनीमध्ये आलेले २० हजार कोटी कोणाचे आहेत. जर हे पैसे आमच्या मुख्यमंत्र्यांचे असतील तर त्यांना जेलमध्ये टाका. पण या प्रश्नाचं उत्तर दिल पाहिजे.

Rahul Gandhi : अदानी वरच्या पुढच्या भाषणाची भीती म्हणून निलंबन; पत्रकार परिषदेमध्ये आरोप

Exit mobile version