Download App

निवडणूक आयोग पुरावे नष्ट करतो, मॅच फिक्स आहे; राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi On Election Commission : महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीच्या निकालावर लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी वारंवार

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi On Election Commission : महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीच्या (Maharashtra Election) निकालावर लोकसभा विरोधीपक्ष नेते राहुल गांधी वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करुन निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर आरोप करत आहे. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी एका वर्तमान पत्रात लेख लिहून पाच स्टेपमध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीत कोणत्या प्रकारे फिक्सिंग करण्यात आली याबाबात माहिती दिली होती. त्यांनी या लेखात महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक 7.83 टक्के मतदार टक्केवारी वाढणे ही इतिहासातील अभूतपूर्व घटना असल्याचे म्हटले होते. तसेच या निवडणुकीत आयुक्तांची निवड, बनावट मतदान, बनावट मतदार, टार्गेट बुथ रिगिंग आणि सीसीटीव्ही पुरावे लपवण्याचे आरोप या लेखात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले होते. तर आता पुन्हा एका राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल करत लोकशाहीची हत्या करण्याचा आरोप केला आहे.

नुकतंच निवडणूक आयोगाने निवडणुकीचे व्हिडिओ आणि फोटो 1 वर्षात नाही तर 45 दिवसांत डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबात आयोगाकडून सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना 30 मे रोजी माहिती देखील देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स वर पोस्ट करत निवडणूक आयोगावर टीका केली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत हे मॅच फिक्सिंग असल्याचे म्हटले आहे.

फिक्स्ड निवडणूक लोकशाहीसाठी विष

राहुल गांधी एक्सवर म्हटले की, मतदार यादी मशीन- रीडेबल स्वरुपात दिली जाणार नाही, सीसीटिव्ही फुटेज कायदा बदलून लपवले जाणार आणि आता निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ 1 वर्षात नाही तर 45 दिवसांत डिलीट केले जाणार, ज्यांच्याकडून उत्तर हवे होते, तोच पुरावे नष्ट करत आहेत. ज्यामुळे हे स्पष्ट दिसून येत आहे की, मॅच फिक्स आहे आणि फिक्स्ड निवडणूक लोकशाहीसाठी विष आहे. असं राहुल गांधी यांनी एक्सवर म्हटले आहे.

निवडणूक प्रक्रियेचे व्हिडिओ फुटेज 45 दिवसांसाठी सुरक्षित ठेवली जाणार

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, आता फक्त 45 दिवसांसाठी निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ सुरक्षित ठेवले जाणार आहे. मात्र आयोगाकडून 6 सप्टेंबर 2024 रोजी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांपेक्षा वेगळे आहे.

ट्रम्प यांनी इराणला 14 दिवसांचा वेळ का दिला? ‘टैको प्लॅन’चं सिक्रेट नेमकं काय…

या मार्गदर्शक तत्वांमध्ये निवडणूक प्रक्रियेच्या विविध टप्प्यांचे व्हिडिओ फुटेज सुरक्षित करण्यासाठी तीन महिने ते एका वर्षापर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आली होती. मात्र आता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत निवडणूकीचे सर्व व्हिडिओ आणि फोटो 45 दिवसात डिलीट करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

follow us