Mahakumbh 2025: जानेवारी महिन्यात सुरु झालेल्या महाकुंभ मेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासह अनेक नेत्यांनी संगमात पवित्र स्नान केले आहे. तर आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) देखील पवित्र स्नानासाठी महाकुंभात जाऊ शकतात. राहुल गांधी यांच्यासह खासदार प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) देखील पवित्र स्नानासाठी महाकुंभात जाऊ शकतात अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, यूपी काँग्रेसला (UP Congress) यासाठी तयार राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र कोणत्या दिवशी राहुल गांधी महाकुंभात जाणार याबाबत निर्णय झालेला नाही. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यापुर्वी 4 फेब्रुवारी रोजी महाकुंभात जाणार होते परंतु संसदेच्या कामकाजामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. तर आता संसदेच्या अधिवेशनाचा पहिला टप्पा संपला असल्याने राहुल गांधी महाकुंभात स्नान करण्यासाठी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. महाकुंभ 26 मार्च रोजी संपत आहे.
यूपी प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी देखील त्यांचा कार्यक्रम बदला आहे. त्यांनी काही दिवसापुर्वी महाकुंभ मेळ्यात जाण्याचा कार्यक्रम रद्द केला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, काँग्रेसचे लोक 10 फेब्रुवारीनंतर महाकुंभाला जाणार आहे. राहुल गांधींच्या प्रस्तावित कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांनी आपला कार्यक्रम बदलल्याचे मानले जात आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी श्रीलंकेने रचला इतिहास, विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 174 धावांनी केला पराभव
तर दुसरीकडे आतापर्यंत महाकुंभ मेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, रक्षामंत्री राजनाथ सिंह, अनेक राज्याचे मुख्यमंत्री आणि नेत्यांनी हजेरी लावली होती.