Download App

अर्थसंकल्प जाहीर.. रेल्वेला अर्थमंत्र्यांकडून दे धक्का! गुंतवणूकदारांना शेअर बाजारात बसला फटका

Rail Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडून आज लोकसभेत 2025 साठी अर्थसंकल्प (Budget 2025) सादर

  • Written By: Last Updated:

Rail Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्याकडून आज लोकसभेत 2025 साठी अर्थसंकल्प (Budget 2025) सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी रेल्वेला मोठा धक्का दिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात यावेळी रेल्वेसाठी 2.55 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर मागच्या वेळी रेल्वेसाठी 2.62 लाख कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली होती.

यंदाच्या बजेटमध्ये देखील रेल्वेला विक्रमी बजेट मिळणार असल्याची अपेक्षा गुंतवणूकदारांना होती मात्र असं न झाल्याने शेअर बाजारात आरव्हीएनएल (RVNL)  सारख्या शेअरमध्ये 9% पर्यंत घसरण झाली आहे तर इरकॉनचे (IRCON) शेअरमध्ये 8 टक्के आणि टेक्समॅको (Texmaco) , आयआरएफसी (IRFC) , टियाटागढ रेल (Tiatagarh Rail) आणि ज्युपिटर वॅगन्समध्ये (Jupiter Wagons) 5-7  टक्के घसरण पहिला मिळाली आहे.

यंदा रेल्वेसाठी 2.55 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी 3445 कोटी रुपये महसुलावर आणि 2,52,000 कोटी रुपये भांडवली खर्चावर खर्च होणार आहे. तर पेन्शन फंडात 66 हजार कोटी रुपये, नवीन लाईन टाकण्यासाठी 32,235 कोटी रुपये तसेच या मार्गांच्या दुपदरीकरणासाठी 32,000 कोटी रुपये आणि त्यांचे गेज लाईन्समध्ये रूपांतर करण्यासाठी 4,550 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी गेल्या वर्षाच्या बजेटमध्ये रेल्वेला अतिरिक्त तरतूद करण्यात आली होती. ज्यामध्ये औद्योगिक क्लस्टर्सना आधार देण्यासाठी पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. मात्र यंदाच्या बजेटमध्ये सिग्नलिंग आणि टेलिकॉमसाठी 6,800 कोटी रुपये, पॉवर लाईन्ससाठी 6,150 कोटी रुपये, कर्मचारी कल्याणासाठी 833 कोटी रुपये वाटप करण्यात येणार आहे. याचबरोबर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी 301 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. तर 45 हजार कोटी रुपये रेल्वे सुरक्षा निधीत हस्तांतरित करण्यात येणार आहे.

सोशल मीडियावर धमाका, ‘आता थांबायचं नाय’ चे दमदार टायटल पोस्टर लाँच

रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या दशकात भारतीय रेल्वेने 31,180 ट्रॅक किलोमीटर सुरू केले आहे. 2014-15 मध्ये दररोज 4 किलोमीटरवरून 2023-24 मध्ये दररोज 14.54 किलोमीटरपर्यंत गती कामाला देण्यात आली आहे. तसेच 2014 ते 2024 दरम्यान 41,655 रूट किलोमीटर (RKM) चे विद्युतीकरण साध्य करण्यात आले असल्याची देखील माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

follow us