Download App

पुणे अपघाताची पुनरावृत्ती! खासदाराच्या मुलीने फुटपाथवरच्या लोकांना चिरडलं; एकाचा मृत्यू, जामीनही मिळाला

पुणे कार अपघाताची घटना ताजी असतानाच चेन्नईतही अशीच घटना घडली. खासदाराच्या मुलीने आपल्या BMW कारने झोपलेल्या लोकांना चिरडलं.

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

MP Daughter Runs Bmw Over Man : गेली महिनाभर पुणे कार अपघाताचं प्रकरण राज्यासह देशभरात गाजत आहे. (Car Accident) आता याच घटनेची पुनरावत्ती झाल्याचं पाहायला मिळतं आहे. (BMW) मोठ्या घरातल्या एका मुलीने फुटपाथवर झोपलेल्या लोकांना आपल्या कारने (BMW)चिरडलं आहे. (MP Daughter) यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे, मुलीला जामीनही मिळाला आहे.

घटनास्थळावरून पसार वेळेआधी दाखल होऊनही मध्यातच मॉन्सूनची गती मंदावली; पावसाचा जोरही ओसरला

या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मुलगी राज्यसभा खासदाराची मुलगी आहे. या मुलीसोबत तिची आणखी एक मैत्रिणही होती. हा अपघात झाला तेव्हा गाडी चालवणाही ही खासदाराची मुलगी मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. गाडीने येथील २४ वर्षीय पेंटर सूर्याला चिरडलं. आरोपी माधुरी घटनास्थळावरून पसार झाली. तर, तिची मैत्रिण कारमधून उतरली आणि ती तेथील जमलेल्या लोकांशी भांडत होती. त्यानंतर तिही तेथून निघून गेली.

लगेच जामीन मिळाला

चेन्नईमध्ये वायएसआर काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार बीडा मस्तान राव यांची मुलगी माधुरी BMW चालवत होती. चेन्नईच्या बसंत नगरमध्ये सूर्या फुटपाथवर झोपला होता. यावेळी आरोपी माधुरीने दारुच्या नशेत सूर्याच्या अंगावर BMW घातल्याचा आरोप आहे. आरोपी माधुरीला लगेच जामीन मिळाला असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

कठोर कारवाईची  मागणी सगळं बघतो, 56 वर्ष सतत निवडून येणारा माझ्याशिवाय कोणी दाखवा; पवारांनी थोपटले दंड

घटना घडल्यानंतर तेथील काही लोकांनी सूर्याला तात्काळ जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. मात्र, तो गंभीर जखमी झाला असल्याने त्याचा मृत्यू झाला. सूर्याचे ८ महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं. घटनेची माहिती मिळताच सूर्याचे कुटुंबीय आणि इतर लोक शास्त्री नगर पोलीस स्टेशनजवळ गोळा झाले. आरोपी विरोधात कठोर कारवाईची त्यांनी मागणी केली आहे.

BMR ग्रुप सी-फूड इंडस्ट्रीतील नाव

पोलिसांनी याप्रकरणी सीसीटीव्ही तपासला. BMW खासदार बीडा मस्तान राव यांची असल्याचं पोलिसांना आढळून आलं. तसंच, BMW ची नोंदणी पुद्दुचेरी येथे झालेली आहे. दरम्यान, या प्रकरणात माधुरीला अटक झाली होती. पण तिला लगेच जामीन मिळाला आहे. दरम्यान, राव हे २०२२ मध्ये राज्यसभा खासदार झाले आहेत. त्याआधी ते आमदार होते. त्यांच्या मालकीच्या BMR ग्रुप सी-फूड इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव आहे.

follow us

वेब स्टोरीज