वेळेआधी दाखल होऊनही मध्यातच मॉन्सूनची गती मंदावली; पावसाचा जोरही ओसरला
Weather update : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत मॉन्सून चांगला जोर धरून आहे. (Rain) यामध्ये संपूर्ण मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही पाऊस कोसळत आहे. विदर्भात पाहायला गेल तर अमरावती आणि चंद्रपूरपर्यंतच्या भागापर्यंतही त्याने धाव घेतली आहे. मात्र, यानंतर मॉन्सूनची वाटचाल काही पुढे जात असल्याची दिसली नाही. (Weather) आजपर्यंतह तो याच भागात बरसत आहे पुढे काही सरकलेला नाही.
हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली पुढील 48 तास जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी
महाराष्ट्रात आल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) प्रगतीला ‘ब्रेक’ लागल्याची स्थिती निर्माण झाल्याचं दिसत आहे. राज्यात पावसाचा जोर ओसरला असून, गेल्या आठ दिवसांपासून त्याच्या वाटचालीत फारशी प्रगती झालेली नाही, अशी माहिती हवामान विभागातर्फे देण्यात आली. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे.
पावसाची उघडीप सगळं बघतो, 56 वर्ष सतत निवडून येणारा माझ्याशिवाय कोणी दाखवा; पवारांनी थोपटले दंड
राज्यात १ ते १६ जून या दरम्यान ९३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या दरम्यान राज्यात सरासरी ८५.२ मिलिमीटर पाऊस पडतो. सरासरीपेक्षा १० टक्के जास्त पाऊस पडल्याचं चित्र सध्या असलं तरीही यातील बहुतांश पाऊस पूर्वमोसमी आहे. त्यामुळे मॉन्सून आल्यानंतर राज्यात दमदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली नसल्याचंही निरीक्षण हवामान खात्याकडून नोंदण्यात आलं आहे.