Download App

Ram Mandir : कडाक्याच्या थंडीतही रामभक्तांची अलोट गर्दी; रामलल्लांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा

Ram Mandir : देशातील कोट्यावधी रामभक्तांचे (Ayodhya Ram Mandir) तब्बल 500 वर्षांपासूनचं स्वप्न काल पूर्ण झालं. अयोध्येत श्रीराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या (PM Narendra Modi) हस्ते मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानंतर आजपासून सर्वसामान्यांना श्रीरामांचे दर्शन घेता येणार आहे. रामभक्त थेट मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. परंतु, आज पहिल्याच दिवशी येथे प्रचंड गर्दी झाली आहे. अत्यंत कडाक्यााच्या थंडीतही रामलल्लांच्या दर्शनासाठी तुडूंब गर्दी झाली असून लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पहाटे तीन वाजल्यापासूनच रामभक्तांनी येथे गर्दी केली आहे. सकाळी 8 वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात झाली असून रात्री 10 वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे.

दुपारी 1 वाजल्यानंतर दोन तासांसाठी मंदिर बंद राहिल त्यानंतर पुन्हा दर्शनास सुरुवात होईल आणि रात्री 10 वाजेपर्यंत भक्तांना रामलल्लांचे दर्शन घेता येणार आहे. दुपारी 12.30 आणि रात्री 7.30 यावेळेत आरती होणार आहे. आरतीसाठी पासची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतींना पास घेता येतील. आज दर्शनाचा पहिलाच दिवस आहे. त्यामुळे अगदी पहाटेपासूनच रामभक्तांची तुडूंब गर्दी झाली आहे. मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मंदिरातही प्रचंड गर्दी झाली असून चेंगराचेंगरी होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

जय श्रीरामच्या घोषणांनी मंदिराचा परिसर दणाणून गेला आहे. या भक्तांच्या दर्शनाची व्यवस्था करताना व्यवस्थापनाचीही मोठी कसरत होत आहे. परंतु, गर्दी वाढल्याने या व्यवस्थेवरही ताण आला आहे.

तिकीट अगोदर बुक करावे लागेल
जर तुम्ही राम मंदिरात जाण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मंदिर परिसरात जाण्यासाठी आगाऊ तिकीट बुक करावे लागेल. खरं तर, कोविड -19 च्या वाढत्या प्रकरणांमुळे सध्या केवळ मर्यादित लोकांनाच रामललाच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जात आहे. यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट (SRJTKT) srjbtkshetra.org च्या अधिकृत वेबसाइटवरून भाविक त्यांचे तिकीट ऑनलाइन बुक करू शकतात. तिकीट बुक करताना, तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही तारीख आणि टाइम स्लॉट निवडू शकता.

राम मंदिराला 101 किलो सोनं दान करणारे दिलीप लाखी कोण? मुंबईशी आहे कनेक्शन..

भेट देण्याची हीच योग्य वेळ
राम मंदिर सकाळी 7 ते 11:30 आणि नंतर दुपारी 2 ते 7 या वेळेत दर्शनासाठी खुले राहणार आहे. प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी हे वेळ लक्षात ठेवा. तर, जर तुम्हाला राम आरतीमध्ये सहभागी व्हायचे असेल, तर श्रृंगार आरतीची वेळ सकाळी 06:30, भोग आरतीची वेळ दुपारी 12:00 आणि संध्या आरतीची वेळ 07:30 आहे.

follow us