राम मंदिराला 101 किलो सोनं दान करणारे दिलीप लाखी कोण? मुंबईशी आहे कनेक्शन…
Ayodhya Ram Mandir : करोडो राम भक्तांची प्रतीक्षा आज संपली. ज्या सोहळ्याची अनेक दशकांपासून प्रतीक्षा होती ती आज पूर्ण झाली. अयोध्येत रामाचे मंदिर (Ayodhya Ram Mandir) उभे राहिले आहे. आज या मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रभू रामाला 14 वर्ष वनवासात जावं लागलं होतं. परंतु त्यांच्या भक्तांनी शेकडो वर्षांचा विरह सहन केला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) प्रतिष्ठापनाच्या सोहळ्यात सांगितले.
राममंदिर सोहळ्यासाठी देश-विदेशातून भरपूर देणग्या देण्यात आल्या आहेत. अनेकांनी आपल्या क्षमतेनुसार देणगी दिली. सुरतमधील एका हिरे व्यापाऱ्याने राम मंदिरासाठी 101 किलो सोने दान केले आहे. राम मंदिरासाठी एकूण 5500 कोटी रुपयांच्या आसपास देणग्या जमा झाल्या आहेत. राम मंदिरातील गाभारा दरवाजासह एकूण 15 दरवाजे सोन्याचे आहेत.
भगवा वेश, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा… उद्धव ठाकरेंकडून काळाराम मंदिरात महाआरती
सुरतमध्ये राहणारे दिलीपकुमार व्ही. लाखी (Dilip Kumar Lakhi) हे हिऱ्यांचे मोठा व्यापारी आहेत. त्यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून हिऱ्यांच्या व्यवसायात आहे. लाखी कुटुंबाने राम मंदिरासाठी 101 किलो सोने दान केले आहे. राम मंदिराचे दरवाजे, गभारा, त्रिशूळ, डमरू आणि खांबांमध्ये या सोन्याचा वापर करण्यात आला आहे. या सर्व वस्तूंना सोन्याचे पान देण्यात आले आहे.
लाखी यांनी दिलेले दान हे राम मंदिराला मिळालेले सर्वात मोठे दान आहे. सध्या 1 तोळा सोन्याचा भाव 68 हजार रुपये आहे. म्हणजे 1 किलो सोन्याची किंमत 68 लाख रुपये होते. म्हणजेच 101 किलो सोन्याची किंमत 68 कोटींच्या पुढे गेली आहे.
राम मंदिर सोहळ्यानिमित्ताने चाहत्यांना खास भेट; ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’च्या रिलीज डेट जाहीर
देशाच्या फाळणीपूर्वी दिलीप लाखी यांचे वडील विशिनदास होलाराम हे हिरे व्यापारी कुटुंबात जयपूरला आले. 1944 मध्ये ते जयपूरला आले तेव्हा ते 13 वर्षांचे होते. तरुणपणी दिलीपकुमार यांच्याकडून ते धडे घेत असत. उरलेला वेळ व्यवसाय सांभाळला. दिलीप कुमार यांच्यावर वडिलांचा संघर्ष, मेहनत आणि कौशल्य यांचा प्रभाव होता.
1972 मध्ये दिलीप कुमार यांच्या वडिलांनी मुंबईतील झवेरी बाजारात दुकान उघडण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी दिलीपकुमार यांना मुंबईला बोलावले. दिलीप कुमार यांनी वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला. त्यांनी व्यवसायात चांगले यश मिळवले. त्यांची कारकीर्द मुंबईत सुरू झाली आणि बहरली. सध्या सुरतमध्ये लाखींची हिऱ्यांना पैलू पाडण्याचा कारखाना आहे. त्यात 6 हजार कर्मचारी काम करतात.
Ayodhya : राम मंदिर आंदोलनात मोठं योगदान देणाऱ्या उमा भारती-साध्वी ऋतंभरा ढसाढसा रडल्या