राहुल गांधींना मंदिर प्रवेश नाकारला; नाना पटोले म्हणाले, भाजपाला सत्तेचा माज अन् अहंकार…

राहुल गांधींना मंदिर प्रवेश नाकारला; नाना पटोले म्हणाले, भाजपाला सत्तेचा माज अन् अहंकार…

Ayodhya Ram Mandir : राहुल गांधी (Rahul Gandhi) मंदिरात जात असताना त्यांना मनाई करणं, त्यांच्या गाडीवर दगडफेक करणं, तिथल्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करणं हेच का भाजपला श्रीरामाने शिकवलं? भाजपाला सत्तेचा माज आलाय. त्यांचा हा माज देशातील जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.

भगवान श्रीराम फक्त आमचेचं आहेत, असं ते सांगतात. श्रीरामला मर्यादित अन् लहान करुन मोदींना मोठे करायचे आहे, त्यांचे बॅनर जागोजागी लागलेत. मोदींच्या बोटाला धरून श्रीराम चाललेत. त्यावर लिहिलंय की मोदींनी घर बांधून दिलं. श्रीरामला घर बांधून देण्याची तुमची काय औकात आहे? भाजप श्रीरामाला लहान समजायला लागली आहे. त्यांना त्यांच्या अहंकाराचे फळ भोगावं लागेल, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

“छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच पंतप्रधान मोदीही श्रीमंत योगी” : गोविंद देवगिरी महाराज

अयोध्येत बांधण्यात आलेले राम मंदिर हे पी. व्ही. नरसिंह राव यांनी पंतप्रधान असताना दिलेल्या 60 एकर जागेवर बांधण्यात आलं आहे. हा मार्ग त्या काळात काँग्रेसनेच काढला. गुजरातमधील सोमनाथचे मंदिर मोघलांनी तोडलं होतं पण पंडित जवाहलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांनी देश स्वतंत्र झाल्यावर मंदिर बांधले. याचा त्यांनी उहापोह केला नाही. प्राणप्रतिष्ठा त्यांनी शंकराचार्यांच्या हातांनी करुन घेतली होती. इथं चार-चार शंकराचार्यांनी मंदिर अपूर्ण आहे म्हणून विरोध केला. पण हे शंकराचार्यांपेक्षा मोठे झालेत. केंद्रातले मंत्री सांगतात की शंकराचार्यांचा हिंदू धर्माशी काय संबंध? धर्मापेक्षा आणि शंकराचार्यांपेक्षाही भाजपवाले मोठे झाले आहेत का, असा टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली.

सध्या देशात जे काही सुरु आहेत ते चांगलं सुरु आहे असं कोणीही म्हणणार नाही. धर्माचा नावाने राजकारण केलं जातंय. एकीकडे श्रीरामाचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे द्वेष वाढवायचा. मनात रावणाचा विचार ठेवायचा आणि एकीकडे श्रीराम दाखवायचा. ह्या कृत्याचा आम्ही निषेध करतो, असे नाना पटोले म्हणाले.

“मी प्रभू श्री रामाची माफीही मागतो” : भव्य-दिव्य सोहळ्यानंतरही पंतप्रधान मोदी असे का म्हणाले?

आसाममध्ये राहुल गांधी दर्शन करण्यासाठी मंदिरात जात असताना त्यांना तिथं थांबवलं गेलं, त्यांना प्रवेश नाकारला गेला. राहुल गांधींना मंदिर प्रवेशासाठी संघर्ष करावा लागत असेल तर हिंदू खतरे में है अशा घोषणा देणाऱ्या लोकांना जुन्या काळाची आठवण करुन दिली पाहिजे. नाशिकच्या काळाराम मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या अनुयायांना दर्शन घेण्यासाठी मनाई करणारी लोक आता सत्तेत आहेत का? असा सवाल नाना पटोले यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज