“मी प्रभू श्री रामाची माफीही मागतो” : भव्य-दिव्य सोहळ्यानंतरही पंतप्रधान मोदी असे का म्हणाले?

“मी प्रभू श्री रामाची माफीही मागतो” : भव्य-दिव्य सोहळ्यानंतरही पंतप्रधान मोदी असे का म्हणाले?

अयोध्या : “मी प्रभू श्री रामाची माफीही मागतो. आपल्या प्रयत्नांमध्ये, आपल्या त्याग आणि तपश्चर्येमध्ये काहीतरी कमतरता असावी की आपण हे काम इतक्या शतकांपासून करू शकलो नाही. पण आज ती उणीव पूर्ण झाली आहे आणि मला विश्वास आहे की प्रभू श्रीराम आपल्या सर्वांना माफ करतील, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रभू श्रीराम मंदिर उद्घाटन आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. (Prime Minister Narendra Modi apologized to Lord Shri Ram for taking time to build the temple.)

अवघ्या देशवासियांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील (Ayodhya) प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. पवित्र मंत्रोच्चार, शंखनाद आणि आणि जय श्री रामाच्या घोषणेसह प्रभू श्रीराम तंबूमधून भव्य मंदिरात विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते विधिवत पूजा करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या देशाने याची देही याची डोळा पाहिला. त्यामुळे हा सोहळा द्विगुणित झाला.

Ram Mandir : महाराष्ट्रातील मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा, कोण आहेत लक्ष्मीकांत दीक्षित?

या कार्यक्रमानंतर कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. याचवेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी श्रीरामांची माफी मागितली.

रामललाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, शतकानुशतकांच्या तपश्चर्येनंतर, संयम, त्यागानंतर आज आपला राम परत आला आहे. आपले प्रभू श्रीराम परत आले आहेत. 22 जानेवारी ही केवळ कॅलेंडरवर लिहिलेली तारीख नाही तर, आजचा दिवस हा नव्या कालचक्राचा उगम आहे. आमचा रामलला आता तंबूत राहणार नाही, तर आता दिव्य मंदिरात विराजमान झाला आहे. हा क्षण सर्वात पवित्र आहे. हा क्षण अलौकिक आहे. ही ऊर्जा आणि वेळ आपल्या सर्वांवर प्रभू श्री रामाचा आशीर्वाद आहे.

Ayodhya : ते खास 84 सेकंद…; प्राणप्रतिष्ठापनेसाठी 1.24 मिनिटांचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या वैशिष्ट्य

मी नुकताच तुम्हा सर्वांसमोर गर्भगृहातून चैतन्याचा साक्षीदार म्हणून तुमच्यासमोर आलो आहे. तुम्हाला सांगण्यासारखे खूप काही आहे पण माझा कंठ दाटून आला आहे. मी प्रभू श्री रामाची माफीही मागतो. आपल्या प्रयत्नांमध्ये, आपल्या त्याग आणि तपश्चर्येमध्ये काहीतरी कमतरता असावी की आपण हे काम इतक्या शतकांपासून करू शकलो नाही, अशी खंत व्यक्त करत आज ती उणीव पूर्ण झाली आहे आणि मला विश्वास आहे की प्रभू श्री राम आपल्या सर्वांना माफ करतील, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज