Download App

Ram Mandir : …म्हणून श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी 22 तारीख अन् ते 84 सेकंद महत्त्वाचे

  • Written By: Last Updated:

Ram Mandir : अयोध्येमध्ये निर्माण करण्यात आलेल्या भव्य अशा राम मंदिराची (Ram Mandir ) देशासह जगभरात चर्चा सुरू आहे. मात्र राम मंदिराच्या उद्घाटनाची 22 जानेवारी ही तारीख आणि श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा दुपारी 12 वाजून 29 मिनिट 8 सेकंदांचा हाच मुहूर्त का निवडण्यात आला? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल ना. चला तर जाणून घेऊ काय आहे? या मुहूर्ताची खासियत…

Indian Navy : ‘राजमुद्रे’चाच आधार! नौदलातील अधिकाऱ्यांच्या बॅजमध्ये मोठा बदल

धार्मिक कार्यक्रमांमध्ये मुहूर्ताला अत्यंत महत्त्व असतं. त्यामुळेच ज्यावेळी 5 ऑगस्ट 2020 ला श्रीराम मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. तो मुहूर्त अशुभ असल्याने त्यावरती संत-महंतांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे यावेळी प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहुर्त काशीच्या पंडीतांकडून काढण्यात आला आहे.

Crime News: मुंबईत 5.77 कोटी रुपयांच्या विदेशी सिगारेट जप्त, आरोपीला अटक

हा मुहूर्त निवडण मागचं कारण म्हणजे मकर संक्रांतीनंतर 16 ते 24 जानेवारी या दरम्यान सर्व शुभ मुहूर्त आहेत. त्यामुळे सुरुवातीला 24 जानेवारी ही तारीख प्राणप्रतिष्ठेसाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र त्यानंतर मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी यांनी काशी आणि इतर ठिकाणच्या विद्वानांशी चर्चा केली. त्यामध्ये 22 तारीख हा मुहूर्त निश्चित करण्यात आला.

Nashik News : नाशिक पोलिसांनी नंबर दिला मदतीसाठी.. पण प्रत्यक्षात काय घडलं?

कारण प्रभू श्रीरामांचा जन्म अभिजीत मुहूर्तावर झाला होता. 22 जानेवारीला अभिजीत मुहूर्त जास्त वेळासाठी म्हणजे 84 सेकंद आहे. जेव्हा की, इतर दिवशी ते अत्यंत कमी वेळासाठी राहणार आहे. त्यामुळे 22 जानेवारी हा दिवस आणि दुपारी 12 वाजून 29 मिनिटे आणि 8 सेकंद ही वेळ प्रभू श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी निश्चित करण्यात आली. 84 सेकंदसाठी असलेला हा अभिजीत मुहूर्त भारतासाठी संजीवनी ठरू शकतो. कारण या मुहूर्ताचे 16 पैकी दहा गुण चांगले आहेत. त्यामुळे हा अत्यंत सूक्ष्म असलेला मुहूर्त राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सर्वाधिक शुभ मानला गेला आहे.

या प्राणप्रतिष्ठेच्या एक तास अगोदर यज्ञ, हवन, चारही वेदांचे पठण आणि इतर ग्रंथांचा वाचन देखील करण्यात येणार आहे. तर हा सोहळ्यामध्ये 16 जानेवारीला शरयू नदीची जलयात्र होणार आहे. त्यानंतर 17 जानेवारीला गणेश पूजा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होईल. तर विविध धार्मिक कार्यक्रमानंतर 22 जानेवारीला प्रत्यक्ष मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रभू श्रीरामांचे प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडेल.

follow us