Download App

मोठी बातमी! रवींद्र रैना यांनी दिला भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

Ravindra Raina Resign : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून जम्मू काश्मीरमध्ये भाजपचा पराभव होताना दिसत आहे.

  • Written By: Last Updated:

Ravindra Raina Resign : जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून जम्मू काश्मीरमध्ये भाजपचा पराभव होताना दिसत आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनी जम्मू-काश्मीर भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

माहितीनुसार, रवींद्र रैना यांनी जम्मू-काश्मीर भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नौशेरा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर त्यांनी मोठा निर्णय घेत जम्मू-काश्मीर भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आज सकाळी माध्यमांशी बोलताना रवींद्र रैना यांनी नौशेरा मतदारसंघातून आपण विजयी होणार असल्याची घोषणा केली होती मात्र निकाल त्यांच्या बाजूने लागलेला नाही. तसेच त्यांनी काश्मीरमध्ये किमान 15-16 अपक्ष उमेदवार आहेत, जे जिंकल्यानंतर भाजपला पाठिंबा देतील आणि जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सरकार स्थापन करेल.

हरियाणात तिसऱ्यांदा भाजप सरकार पण ‘हे’ पाच मंत्री पराभूत, जाणून घ्या कोण आहे?

कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत आतपर्यंत नॅशनल कॉन्फरन्सने (NC) 41 तर भाजपने (BJP) 29 आणि काँग्रेसने (Congress) 6 जागांवर आघाडी घेतली आहे. यावेळी जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणूक झाल्या होत्या.

काश्मीर खोऱ्यात पुन्हा ‘ओमर’ राज, ओमर अब्दुल्ला होणार CM; फारुक अब्दुल्लांची घोषणा

follow us