RBI News : भारतीय रिजर्व बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांनी ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली. ऑनलाइन बँकिंग व्यवहारांत वाढ होत आहे मात्र त्याचबरोबर सायबर फसवणुकीच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. या घटना (Cyber Fraud) रोखण्यासाठी कठोर नियम लागू करण्याची आवश्यकता आहे. या दिशेने हालचाली करण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिल 2025 पासून बँकांसाठी Bank.in डोमेन सुरू केले जाणार असल्याची माहिती आहे.
सायबर फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हे डोमेन फक्त अधिकृत बँकांनाच देण्यात येईल. यामुळे ग्राहकांना सुरक्षित डिजिटल बँकिंग व्यवहार करता येतील. बनावट वेबसाइटपासून होणारे गैरव्यवहार रोखता येतील. या माध्यमातून ऑनलाइन बँकिंग क्षेत्रात आणखी सुरक्षितता येणार आहे. फसवणुकीच्या घटना कमी होण्यास मदत होईल.
मोठी बातमी! नव्या गव्हर्नरांचं गिफ्ट, कर्जाचा हप्ता कमी होणार; रेपो दरात 0.25 टक्के कपात
रिजर्व बँक मॉनिटरी पॉलिसी बैठकीतील निर्णयांची माहिती (RBI Monetary Policy) समोर आली आहे. आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत यंदाही रेपो रेटमध्ये (Repo Rate) कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी आरबीआयने 25 बेसिक पॉइंट्सने (0.25 टक्के) रेपो दरात कपात केली आहे. यामुळे कर्जदारांना दिलासा मिळणार आहे.
त्यांच्या कर्जाचा हप्ता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. बँकेने तब्बल पाच वर्षांनंतर रेपो दरात कपात केली आहे. याआधी सन 2020 मध्ये रेपो दरात कपात झाली होती. नंतरच्या काळात मात्र रेपो दरात वाढ होत 6.5 टक्क्यांवर पोहोचला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात वाढ झाली होती. त्यानंतर मात्र हा दर स्थिर राहिला होता.
गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले, या आर्थिक वर्षात महागाई 4.8 टक्के राहण्याचा अंदाज आहे. आगामी काळात महागाई आणखी कमी होण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर आणि घाऊक महागाई दर दोन्हींतही बदल झाला होता. किरकोळ महागाई चार महिन्यांच्या निचांकी 5.22 टक्क्यांवर आहे. तर घाऊक महागाईत वाढ होऊन हा दर 2.37 टक्क्यांवर पोहोचला आहे.
Video: राहुल गांधींनी केंद्र सरकारला महागाईवरुन घेरलं; बाजारात लसणाचा भाव विचारताच झाले अवाक
बँकेच्या पतधोरण समितीने आर्थिक वर्ष 2025 मध्ये महागाई दर 4.8 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. डिसेंबर तिमाहीत यामध्ये 5.7 टक्के तर मार्च तिमाहीत 4.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. 2026 या वर्षातील पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात महागाई दर 4.6 टक्के आणि जुलै ते सप्टेंबर या काळात महागाई दर 4 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.