मोठी बातमी! नव्या गव्हर्नरांचं गिफ्ट, कर्जाचा हप्ता कमी होणार; रेपो दरात 0.25 टक्के कपात

मोठी बातमी! नव्या गव्हर्नरांचं गिफ्ट, कर्जाचा हप्ता कमी होणार; रेपो दरात 0.25 टक्के कपात

RBI Monetary Policy : रिजर्व बँक मॉनिटरी पॉलिसी बैठकीतील निर्णयांची माहिती (RBI Monetary Policy) समोर आली आहे. आरबीआयचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत यंदाही रेपो रेटमध्ये (Repo Rate) कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.यावेळी आरबीआयने 25 बेसिक पॉइंट्सने (0.25 टक्के) रेपो दरात कपात केली आहे. यामुळे कर्जदारांना दिलासा मिळणार आहे. त्यांच्या कर्जाचा हप्ता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. बँकेने तब्बल पाच वर्षांनंतर रेपो दरात कपात केली आहे. याआधी सन 2020 मध्ये रेपो दरात कपात झाली होती. नंतरच्या काळात मात्र रेपो दरात वाढ होत 6.5 टक्क्यांवर पोहोचला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात वाढ झाली होती. त्यानंतर मात्र हा दर स्थिर राहिला होता.

मोठी बातमी! कर्जाचा हप्ता वाढणार नाही; आरबीआयकडून रेपो रेट पुन्हा जैसे थे

गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बैठकीत सांगितले की अर्थव्यवस्थेच्या विकासावर चर्चा करण्यात आली. रेपो दरात कपात करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्के करण्यात आला आहे. यानंतर आता कर्जाच्या हप्त्यात कपात होईल अशी शक्यता आहे. देशाची अर्थव्यवस्था सध्या संकटात आहे. जागतिक अर्थव्यवस्थाही संकटात आहे. फेडरल रिजर्व बँकेकडूनही दर कपात होत आहे. दुसरीकडे जियो पॉलिटिकल टेन्शनही वाढत चाललं आहे त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे.

भारतीय रुपयावर दबाव वाढत चालला आहे. त्यामुळे रिजर्व बँकेसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. रियल जीडीपी ग्रोथचा अंदाज 2025 या आर्थिक वर्षात 6.5 टक्के आहे. मागील वर्षात हा दर 8.2 टक्के होता. आगामी काळात जीडीपीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. उत्पादन क्षेत्रात सुधारणा होणार आहे. मायनिंग सेक्टरमध्ये सुद्धा सुधारणा होण्याचा अंदाज आहे. पीएमआय सर्व्हिसमध्ये मागील तिमाहीत घसरण दिसून आली होती.

मोठी बातमी! ना कर्ज होणार स्वस्त, ना EMI कमी होणार; महागाईतही रेपो रेट जैसे थे

महागाई कमी करण्याचं आव्हान

गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले, या आर्थिक वर्षात महागाई 4.8 टक्के राहण्याचा अंदाज आहे. आगामी काळात महागाई आणखी कमी होण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर आणि घाऊक महागाई दर दोन्हींतही बदल झाला होता. किरकोळ महागाई चार महिन्यांच्या निचांकी 5.22 टक्क्यांवर आहे. तर घाऊक महागाईत वाढ होऊन हा दर 2.37 टक्क्यांवर पोहोचला आहे.

बँकेच्या पतधोरण समितीने आर्थिक वर्ष 2025 मध्ये महागाई दर 4.8 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. डिसेंबर तिमाहीत यामध्ये 5.7 टक्के तर मार्च तिमाहीत 4.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. 2026 या वर्षातील पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात महागाई दर 4.6 टक्के आणि जुलै ते सप्टेंबर या काळात महागाई दर 4 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube