रेपो रेट कपातीनंतर 25 लाख अन् 1 कोटींच्या कर्जावर किती EMI! जाणून घ्या, डिटेल्स..

आरबीआयच्या या निर्णयामुळे होमलोन, कारलोन, एज्युकेशन लोन आणि पर्सनल लोनच्या व्याजरदरात कपात होण्याची अपेक्षा आहे.

Home Loan EMI

Home Loan EMI

RBI Rate Cut : आरबीआयने तब्बल पाच वर्षांनंतर रेपो दरात (RBI Rate Cut) कपात केली आहे. या निर्णयामुळे रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून (Repo Rate) 6.25 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. रेपो दरात कपातीनंतर आता बँका, होमलोन हाऊसिंग फायनान्स कंपन्या व्याज दरात कपात करण्याची घोषणा करतील. आरबीआयच्या या निर्णयामुळे होमलोन, कारलोन, एज्युकेशन लोन आणि पर्सनल लोनच्या व्याजरदरात कपात होण्याची अपेक्षा आहे.

वॉयस ऑफ बँकिंगचे संस्थापक अश्वनी राणा आरबीआयच्या रेपो रेट कपातीच्या निर्णयावर म्हणाले, बजेटमध्ये (Budget 2025) करात दिलासा मिळाल्यानंतर आरबीआने स्वस्त कर्जाचं गिफ्ट दिलं आहे. आरबीआयने पाच वर्षांनंतर रेपो रेटमध्ये 0.25 अकांनी कपात कली आहे. यातून कर्जाचे हप्ते (Loan Installment) भरणाऱ्या ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

मोठी बातमी! नव्या गव्हर्नरांचं गिफ्ट, कर्जाचा हप्ता कमी होणार; रेपो दरात 0.25 टक्के कपात

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (CAIT) राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी रिजर्व बँकेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. व्यापार आणि अन्य कारणांसाठी कर्ज घेण्याच्या खर्चात कपात होईल. होम लोन आणि बिजनेस लोनचे हप्ते कमी झाल्याने आर्थिक दिलासा मिळेल. त्यांच्या डिस्पोजेबल इनकम (खर्चायोग्य उत्पन्न) वाढेल आणि उपभोक्ता खर्चातही वाढ होईल. यामुळे बाजारात रोखता वाढेल. यामुळे व्यावसायिक गुंतवणुकीस चालना मिळेल आणि आर्थिक घडामोडींचा वेग वाढेल.

आता रेपो दरात कपात झाल्याने होम लोनच्या व्याजदरांवर काय परिणाम होईल याची माहिती घेऊ..

एखाद्याने 25 लाख रुपयांचे होम लोन (Home Loan) घेतले असेल. त्याला 8.75 टक्क्यांच्या हिशोबाने 22 हजार 093 रुपये ईएमआय द्यावा लागत होता. परंतु, आता रेपो दरात कपात झाल्याने व्याज दर घटून 8.50 टक्के झाला आहे. त्यामुळे ईएमआय 21 हजार 696 रुपये द्यावा लागेल. म्हणजेच महिन्याला 403 रुपये कमी होतील. वार्षिक 4 हजार 836 रुपये कमी द्यावे लागतील.

50 लाखांच्या कर्जावर किती बचत

जर एखाद्या व्यक्तीने 9 टक्के व्याजदराने 50 लाख रुपयांचे होम लोन घेतलेले असेल. या कर्जाची मर्यादा 20 वर्षांची असेल आणि हा व्यक्ती सध्या 44 हजार 986 रुपये हप्ता भरतोय. आता रेपो दरात कपात झाल्यामुळे त्याला आता 44 हजार 186 रुपये द्यावे लागतील. त्याच्या कर्जाच्या हप्त्यात 800 रुपये कमी होतील. वार्षिक 9 हजार 600 रुपये कमी द्यावे लॉगतील.

एक कोटींच्या कर्जावर किती बचत

समजा एखाद्या ग्राहकाने एक कोटींचे होम लोन 8.75 टक्के दराने घेतले आहे. कर्जाची मुदत 20 वर्षांची आहे. सध्या त्याला 88 हजार 371 रुपये हप्ता भरावा लागत होता. आता रेपो दरात पाव टक्के कपात झाल्याने कर्जाचा हप्ता कमी होऊन 8.50 होईल. तसेच त्याला 86 हजार 782 रुपये ईएमआय द्यावा लागेल. म्हणजेच प्रत्येक महिन्याला 1589 रुपये आणि वार्षिक 19 हजार 68 रुपये कमी द्यावे लागतील.

Exit mobile version