Download App

नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच RBIचा मोठा दणका; ‘ही’ तीन खाती होणार बंद, धक्कादायक कारण

  • Written By: Last Updated:

Reserve Bank Of India Decided Closed Three Types Of Bank Account : देशभरातली नागिरकांसाठी मोठी बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank Of India) एक मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलाय. नवीन वर्षात तीन प्रकारची खाती बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतलाय. नेमकी कोणती खाती बंद होणार आहेत? यामागे नेमकं काय कारण आहे? असा प्रश्न सर्वांना पडतोय. तर सुरक्षेच्या कारणावरून (Bank Account) रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया ही खाती बंद करणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) 2025 च्या सुरूवातीलाच म्हणजे 1 जानेवारीपासून बँकिंगच्या काही नियमांत बदल करण्याचं ठरवलं आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या या निर्णयाचा परिणाम कोट्यवधी नागरिकांवर पडण्याची शक्यता आहे. आरबीआयचा हा नियम बँक खात्यांवर लागू होणार आहे.

वाल्मिक कराड पांढऱ्या स्कॉर्पिओतून आला… ‘ती’ गाडी नेमकी कोणाची? वाचा A टू Z माहिती

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी तसेच बॅंकिंग क्षेत्रामधील पारदर्शकता अन् डिजिटलायझेशला प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच सायबर गुन्हेगारीचा धोका कमी करण्यासाठी हा निर्णय घेतलाय. या निर्णयातंर्गत जी खाती मागील 12 महिन्यांपासून बंद आहेत, म्हणजे ज्या खात्यांमध्ये व्यवहार झालेला नाही, ती खाती कमी करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे आता जी खाती 12 महिन्यांपेक्षा जास्त दिवस बंद असतील, ती बंद करण्यात येणार आहेत.

ज्या बॅंक खात्यांमध्ये मागील 12 महिन्यांपासून व्यवहार झालेला नाही, त्या खात्यांना इनअ‍ॅक्टिव्ह कॅटेगरीत टाकलं जाणार आहे. जर हे खातं तुम्हाला चालू ठेवायला असेल तर तुम्हाला बॅंकेशी संपर्क साधावा लागणार आहे. अनोळखी क्रमांकावरून फोन आला तर पासवर्ड, पिन किंवा ओटीपी शेअर करू नये असं देखील आरबीआयने सांगितलेलं आहे.

Kiribati : बाय बाय 2024! फटाक्यांची आतिषबाजी अन् एकच जल्लोष; ‘या’ देशात नव्या वर्षाला सुरुवात…

तसेच ज्या खात्यांमध्ये बऱ्याच काळापासून शिल्लक शून्य असेल, अशी खाती देखील बंद होणार आहेत. बॅंक खात्याचा दुरूपयोग टाळण्यासाठी आणि फसवणुकीपासून वाचवण्यासाठी हे पाऊल उचललं जातंय. त्याचप्रमाणे असे केल्यास ग्राहक वारंवार त्याच्या खात्याचा उपयोग देखील करणार आहे. तसेच ज्या खात्यांमध्ये दोन वर्षांपासून कोणताही व्यवहार झाला नसेल, ती खाती डॉरमॅट खाती आहेत. ही खाती देखील बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. डॉरमॅट खाती देखील सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर असतात. या खात्यांचा वापर करून देखील ग्राहकांची फसवणूक केली जावू शकते, त्यामुळे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने हा निर्णय घेतलाय.

 

follow us