Download App

कर्नाटकमध्ये महाराष्ट्राची पुनरावृत्ती; एचडी देवेगौडांच्या जेडीएसवर प्रदेशाध्यक्षांनी ठोकला दावा

BJP-JDS Alliance : कर्नाटकमध्ये महाराष्ट्राची राजकारणाची पुनरावृत्ती झाली आहे. जेडीएसच्या प्रदेशाध्यक्षांनी पक्षावर दावा केला आहे. याला कारणे ठरले आहे भाजप-जेडीएस युतीचे (BJP-JDS Alliance). भाजपसोबत युती करण्यावरून जनता दल सेक्युलरमध्ये (जेडीएस) फूट पडण्याची शक्यता आहे. कर्नाटक जेडीएस प्रमुख सी.एम. इब्राहिम म्हणाले की त्यांच्यासोबत असलेले लोक खरे आहेत आणि जेडीएस भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील होणार नाही.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सी.एम. इब्राहिम (C.M. Ibrahim) म्हणाले, “जे आमच्यासोबत येत आहेत, ते या. ज्याला जायचे असेल तो जाऊ शकतो. किती आमदार कोणाकडे जातात ते बघू. मी कर्नाटक जेडीएसचा अध्यक्ष आहे. मी भाजपसोबत युती करणार नाही. अशा स्थितीत विरोधी आघाडी म्हणजे ‘इंडिया’ आणि एन.डी.ए. आम्ही त्यांच्याशी बोलू.

भविष्यात शिवसेना गर्व से कहो MIM हैं बोलेले; आता भाजप-ठाकरे गटामध्ये जोरदार जुंपली

ते पुढे म्हणाले की, जेडीएस आणि भाजपची युती आम्हाला मान्य नाही कारण आम्हीच खरा पक्ष आहोत. नुकतेच माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या जेडीएस आणि भाजपने युतीची घोषणा केली आहे.

एचडी देवेगौडा यांच्याबद्दल काय म्हणाले होते?
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना तुम्ही निर्णय कसे घेऊ शकता या प्रश्नावर इब्राहिम म्हणाले, “त्यांच्याकडे (एचडी देवेगौडा) तामिळनाडू, महाराष्ट्र आणि केरळ नाही. किमान माझ्याकडे कर्नाटक आहे. अशा स्थितीत ते (एच. डी. देवेगौडा) राष्ट्रीय अध्यक्ष कसे असतील? एचडी देवेगौडा हे माझ्या वडिलांसारखे आहेत आणि एचडी कुमारस्वामी हे माझ्या धाकट्या भावासारखे आहेत. अशा स्थितीत मी म्हणतो परत या.

नगर-आष्टी रेल्वेला लागलेली आग आता संशयाच्या भोवऱ्यात, थेट रेल्वे मंत्र्यांकडेच तक्रार

22 सप्टेंबर रोजी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यानंतर जेपी नड्डा यांनी या बैठकीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले की, जेडीएसचे एनडीएमध्ये स्वागत आहे.

https://youtu.be/TWTz-tEoto4?si=vVndro3yaESSjHHp

Tags

follow us