भविष्यात शिवसेना गर्व से कहो MIM हैं बोलेले; आता भाजप-ठाकरे गटामध्ये जोरदार जुंपली
Sushma Andhare On Ashish shelar : राज्यातील समाजवादी जनता परिवारातील संघटनांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला पाठिंबा देण्याचा निर्णय झाला आहे. त्यावरून आता ठाकरे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपमधील नेत्यांनी डिवचण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात शिवसेना गर्व से कहो MIM हैं बोलेल, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. त्याला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्याच पद्धतीने खवचट उत्तर दिले आहे.
नगर-आष्टी रेल्वेला लागलेली आग आता संशयाच्या भोवऱ्यात, थेट रेल्वे मंत्र्यांकडेच तक्रार
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने काय काय करुन दाखवलं…?शिवसैनिकाला मुख्यमंत्री करतो सांगितले आणि स्वतःच मुख्यमंत्री होऊन दाखवलं!, श्रीमती सोनिया गांधी, शरद पवार यांच्या सोबत वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावून दाखवले, राम मंदिरावर टीका करुन दाखवली, हिंदू सणांवर बंदी आणून दाखवली, छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागून दाखवल, छत्रपतींच्या वाघ नखांबाबत प्रश्न चिन्ह निर्माण करुन दाखवले, वंदनीय बाळासाहेबांनी आयुष्यभर ठाकरी फटकारे मारले. त्या काँग्रेस, राष्ट्रवादी, लालू प्रसाद, स्टॅलिन पासून आता समाजवाद्यांसोबत सुपुत्राने जाऊन दाखवलं, असे डिवचणारे शब्द शेलार यांनी आपल्या एक्स (ट्वीटर) मध्ये वापरलेत.
वडेट्टीवार अन् पटोलेंचे पुन्हा दक्षिण-उत्तर! ओबीसी प्रश्नावरुन दोघांच्या दोन स्वतंत्र बैठका
शेलार एवढावरच थांबले नाहीत. “गर्व से कहो हम हिंदू हैं” म्हणणारी शिवसेना आता..”गर्व से कहों हम समाजवादी हैं” म्हणू लागली..! भविष्यात कदाचित “गर्व से कहो हम MIM हैं”सुध्दा म्हणू लागतील!, असे शेलार यांनी म्हटले आहे.
त्याला आता सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अंधारे यांनी आशिष शेलार यांचा थेट आशिष कुरेशी असा उल्लेख केला आहे. त्यानंतर ओ सॉरी म्हणत आशिष शेलार असे म्हटले आहे. फडणवीसानी तुमचे राजकीय क्षितिज मर्यादित केले तरी सुद्धा भाटगिरी करताना स्तर घसरत चाललाय. कोरोना काळात जे उद्धवसाहेबांनी करून दाखवले ना ते तुम्हाला सामान्य परिस्थितीतही करता येत नाही. ट्विट करायची खूमखुमी असेल तर नांदेड संभाजीनगर येथील घटनेवर बोला, असे ट्वीट अंधारे यांचे आहे. त्याबरोबर नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचे मुस्लिम धर्मगुरुंबरोबरचे फोटोही अंधारे यांनी ट्वीट केले आहेत.