Download App

बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला आदर्श मानायचं? औरंगजेब वादावरुन RSS चा आक्रमक सवाल

RSS General Secretary Dattatreya Hosbale On Aurangzeb : राज्यात सध्या औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवरून वाद सुरू आहे. आता या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी भाष्य केलंय. ते म्हणाले की, स्वातंत्र्याची लढाई केवळ इंग्रजांविरुद्ध लढली गेली नव्हती, तर शिवाजी आणि महाराणा प्रताप यांनीही मुघलांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढा दिला. बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीला आदर्श मानायचं की, इथल्या भूमीतील लोकांचा सन्मान (Dattatreya Hosbale On Aurangzeb) करायचा? हे देशातील जनतेने ठरवाचं आहे.

दत्तात्रय होसाबळे म्हणाले की, भूतकाळात अनेक घटना घडल्या आहेत. दिल्लीत एक ‘औरंगजेब रोड’ होता, ज्याचे नाव अब्दुल कलाम रोड असे ठेवण्यात आले. त्यामागे काही कारण होते. औरंगजेबाचा भाऊ दारा शिकोह यांना नायक बनवण्यात आले नाही. गंगा-जमुनी संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्यांनी दारा शिकोह यांना पुढे आणण्याचा विचार कधीच केला नाही. आपण अशा व्यक्तीला आदर्श बनवणार आहोत, जो भारताच्या नीतिमत्तेच्या विरोधात होता की या भूमीच्या परंपरेनुसार काम करणाऱ्यांसोबत जाणार आहोत? जर स्वातंत्र्यलढा ब्रिटिशांविरुद्ध केला जात असेल, तर तो स्वातंत्र्यलढा आहे.

VIDEO : त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी अकराशे कोटी रूपयांची योजना, CM देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

त्यांच्या आधीच्या (ब्रिटिश) लोकांविरुद्धचा लढा देखील स्वातंत्र्यलढा होता. महाराणा प्रतापांनी जे केले ते स्वातंत्र्यासाठी लढा होता. जर आक्रमक मानसिकतेचे लोक असतील तर ते देशासाठी धोका आहेत. आपण आपल्या देशाच्या नीतिमत्तेशी कोणाला जोडायचे, हे आपल्याला ठरवावे लागेल, असा आरएसएसचा ठाम दृष्टिकोन असल्याचं होसाबळे यांनी म्हटलं आहे.

कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये ते बोलत होते. औरंगजेबाने जे केले, त्यासाठी त्याला आयकॉन मानले जाऊ नये असंही आवाहन होसाबळे यांनी केलंय. ते म्हणाले की, भारतातील लोकांना हे ठरवावे लागेल की, ते भारताच्या इतिहासाच्या विरोधात जाणाऱ्या व्यक्तीला आपले आयकॉन बनवायचे आहे, की देशाच्या संस्कृती, परंपरा आणि मातीसोबत जगलेल्या लोकांना आपले आयकॉन बनवायचे. तर हा खरा मुद्दा आहे आणि औरंगजेब त्यात बसत नाही. औरंगजेबाचा भाऊ दारा शिकोह या प्रतिमेला शोभतो. ते म्हणाले की, स्वतंत्र देशाने आपल्याला स्वातंत्र्य कसे मिळाले, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे? देशाच्या शूर सुपुत्रांनी इंग्रजांच्या आधी आलेल्या आक्रमकांविरुद्ध लढा दिला आहे.

किती असते इंजिन ऑइलची लाईफ? खराब ऑईल देईल खिशाला झटका..

कबरीवरून वाद
मुघल शासक औरंगजेबावरून महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. छत्रपती संभाजीनगर या शहराला पूर्वी औरंगाबाद म्हणून ओळखले जात असे, तिथे औरंगजेबाची कबर आहे. या कबरीबाबतचा वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. राज्यात या मुद्द्यावरून राजकीय गदारोळ झाल्यानंतर आता हे संपूर्ण प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. याबाबत उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्मारकांच्या यादीतून औरंगजेबाच्या थडग्याचे नाव वगळण्याचे निर्देश देण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

follow us