कोरोनाचा धोका वाढला; PM मोदींना भेटण्यापूर्वी मंत्र्यांना RT-PCR टेस्ट अनिवार्य

RT-PCR test mandatory for ministers before meeting PM amid Covid surge : देशभरात पुन्हा कोरानाचा वाढता धोका लक्षाता घेता मोदींना (PM Modi) भेटणाऱ्या मंत्र्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार  पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी प्रत्येक मंत्र्यांना आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणी अनिवार्य करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा निर्णय खबरदारी आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून घेण्यात आला आहे. […]

Letsupp Image   2025 06 11T104945.670

Letsupp Image 2025 06 11T104945.670

RT-PCR test mandatory for ministers before meeting PM amid Covid surge : देशभरात पुन्हा कोरानाचा वाढता धोका लक्षाता घेता मोदींना (PM Modi) भेटणाऱ्या मंत्र्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार  पंतप्रधान मोदींना भेटण्यापूर्वी प्रत्येक मंत्र्यांना आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणी अनिवार्य करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा निर्णय खबरदारी आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून घेण्यात आला आहे. बुधवारी (दि.11) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे नवे ३०६ रुग्ण आढळले आहेत आणि सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना पुन्हा येतोय ‘ही’ औषधे आताच ठेवा घरात, मोठा खर्च टळेल

ऑपरेशन सिंदूरमधील शिष्टमंडळाची काल मोदींसोबत भेट

काल (दि.10) संध्याकाळी जगभरात पाकिस्तानविरोधात राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत भारताची भूमिका मांडण्यासाठी विविध पक्षातील खासदारांचे शिष्टमंडळाने मोदींची भेट घेतली. या भेटीदरम्यान या मंत्र्यांनी मोदींनी विविध देशांदरम्यान झालेल्यया भेटीचा सविस्तर आढावा दिला. मात्र, या भेटीपूर्वीही या सर्व खासदार आणि मंत्र्यांना RT-PCT चाचणी करण्यास सांगण्यात आले होते.

पाच वर्षात कोरोनाचे व्हेरिएंट बदलले मग, व्हॅक्सिनपण बदलली का?; येल विद्यापीठाचं रिसर्च काय सांगतं?

त्यानंतर आज (दि.11) दिल्लीतील सर्व भाजप आमदार, खासदार आणि प्रमुख अधिकारी एका महत्त्वाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची शक्यता आहे. या बैठकीत सहभागी होणाऱ्या सर्वांना कोविड-१९ ची चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीपूर्वी सर्वांना कोरोना अहवाल सादर करावा लागेल. त्यानंतरच या सर्वांना बैठकीत सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार आहे.

कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ, नवा व्हेरिएंट किती धोकादायक? ICMR ने दिले महत्त्वाचे अपडेट

देशातील सक्रिय कोविड-१९ प्रकरणांनी आज ७,००० चा टप्पा ओलांडला आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणाऱ्या मंत्र्यांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे आतापर्यंत केरळमध्ये तीन मृत्यूंची नोंद झाली आहे, तर महाराष्ट्र (१) आणि कर्नाटक (२) ही एकमेव राज्ये आहेत जिथे त्याच कालावधीत उर्वरित मृत्यूची नोंद झाली आहे.

Exit mobile version