Download App

मोठी बातमी : सेबीने ‘हिंडेनबर्ग’चे आरोप फेटाळले ! अदानी समूहाला क्लीनचिट

SEBI ON Hindenburg: त्याचा फटका अदानी समूहाच्या शेअर्सला बसला होता. या रिपोर्टनंतर अदानी समूहाचे शेअर्स गडगडले होते.

• Written By: Last Updated:

SEBI ON Hindenburg: अमेरिकेतील संस्था हिंडेनबर्गने (Hindenburg) उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या अदानी समूहावर (Adani Group) गैरव्यवहाराचा आरोप लावले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्याचा फटका अदानी समूहाच्या शेअर्सला बसला होता. या रिपोर्टनंतर अदानी समूहाचे शेअर्स गडगडले होते. त्याचा गुंतवणूकदारांना फटका बसला होता. परंतु भारतीय बाजार नियामक संस्थेने (सेबी) अदानी समूहानाला या प्रकरणात क्लीनचिट दिलीय.

पाकिस्तानी संघाला जपानमध्ये ‘नो एन्ट्री’, विमानतळावर दाखल होताच हकलून दिले; नेमकं घडलं काय?

सेबीने गौतम अदानी आणि अदानी ग्रुप कंपन्यांवरील हिंडेनबर्ग रिसर्चचे आरोप फेटाळून लावलेत. हिंडनर्गने अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, अदानी पॉवर लिमिटेड, अ‍ॅडिकॉर्प एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड, गौतम शांतीलाल अदानी आणि राजेश शांतीलाल अदानी यांच्यावर काही गैरव्यवहाराचे आरोप केले होते. बाजार नियामक सेबीने गौतम अदानी ग्रुपला मोठा दिलासा दिला आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने अमेरिकतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी ग्रुपवर लावलेले आरोप स्पष्टपणे फेटाळलेत. गुरुवारी सेबीने आपला अंतिम निर्णय दिला आहे. त्यात सेबीने स्पष्टपणे सांगितले आहे की अदानी ग्रुप, गौतम अदानी आणि राजेश अदानी तसेच ग्रुप कंपन्या अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर आणि अॅडिकॉर्प एंटरप्रायझेस यांच्याविरुद्धची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यात तथ्य आढळले नाहीत. त्यामुळे आरोप सिद्ध झालेले नाहीत.

After an exhaustive investigation, SEBI has reaffirmed what we have always maintained, that the Hindenburg claims were baseless. Transparency and integrity have always defined the Adani Group.

We deeply feel the pain of the investors who lost money because of this fraudulent… pic.twitter.com/8YKeEYmmp5
— Gautam Adani (@gautam_adani) September 18, 2025

काय म्हटलं आहे सेबीने ?
नियमांचे कोणतेही उल्लंघन आढळले नाही. शिवाय, अनूचित व्यापार पद्धती, बाजारातील फेरफार किंवा अंतर्गत व्यापाराचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे हिंडेनबर्ग प्रकरणात अदानी ग्रुपविरुद्धचे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे सेबी अदानी समूहावर कोणताही दंड ठोठावत नाही. परिणामी, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, अदानी पॉवर लिमिटेड आणि अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड यांना कोणत्याही दायित्वापासून मुक्त करण्यात आले.

नव्या भारताबरोबरच सांस्कृतिक परंपरेचा उलगडला इतिहास, मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन

व्यवहारांमध्ये कोणतेही अनियमितता आढळली नाही

संबंधित-पक्ष व्यवहारांमध्ये कोणतेही अनियमितता आढळली नाही. त्यानंतर, गुरुवारी, बाजार नियामक सेबीने हिंडेनबर्ग रिसर्चने केलेल्या आरोपांबाबत अदानी ग्रुपविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याचा निकाल लावत अदानी ग्रुपला क्लीनचिट दिलीय. उद्योगपती गौतम अदानी यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

follow us