वादाची ठिणगी! धारावी प्रकल्पाला कु्र्ल्यातील मदर डेअरीची जागा; विरोध डावलून जमीन अदानींच्या झोळीत

वादाची ठिणगी! धारावी प्रकल्पाला कु्र्ल्यातील मदर डेअरीची जागा; विरोध डावलून जमीन अदानींच्या झोळीत

Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय (Maharashtra Cabinet Meeting) घेण्यात आले. यात एक असाही निर्णय आहे ज्यामुळे वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. कु्र्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला (Dharavi Project) देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

कुर्ल्यातील जवळपास 8.05 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यात आली आहे. धारावी प्रकल्पाच्या नावाखाली अदानी समुहाला ही जागा देऊ नये यासाठी खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात स्थानिकांनी आंदोलन केले होते. परंतु, सरकारने या विरोधाला डावलून मदर डेअरीची जागा अदानी समुहाला दिली आहे. राज्यातील विरोधी पक्षांकडून अदानींच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर टीका होत असते. आता या निर्णयाने विरोधकांना सरकारला घेरण्याची आणखी एक संधी मिळाली आहे.

धारावीतील जमीन हिसकावून अदानीला दिली जातेय ; तिजोरी दाखवत राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा

धारावी पुनर्विकासाच्या कामात अनेक कुटुंबांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत करावे लागणार आहे. यासाठी मदर डेअरीची जागा मिळावी अशी मागणी अदानी समुहाने केली होती. राज्य सरकारने समुहाची मागणी मान्य केली आहे. मदर डेअरी, देवनार डंपिंग ग्राउंड, मालाडमधील जमिनीचीही मागणी करण्यात आली होती. मात्र विरोधकांनी या जागांना विरोध केला होता. सरकारने मात्र विरोध डावलून मदर डेअरीची जागा धारावीतील कुटुंबांच्या स्थलांतरासाठी दिली आहे. यानंतर आता विरोधी महाविकास आघाडीचे नेते काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना. आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चास मान्यता. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार (आदिवासी विकास विभाग)

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची कुर्ला येथील ८.५ हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणांना मान्यता ( महसूल विभाग)

राज्य कामगार विमा महामंडळाच्या दोनशे खाटांच्या विमा कामगार रुग्णालय उभारणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे करोडी येथील सहा हेक्टर गायरान जमीन. याशिवाय बिबवेवाडी- पुणे, अहिल्यानगर, सांगली अमरावती, बल्लारपूर- चंद्रपूर, सिन्नर- नाशिक, बारामती, सातारा आणि पनवेल येथील रुग्णालयांना जमीन देण्यास तत्वतः मान्यता
(महसूल विभाग)

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास पथकराच्या सवलतीसाठी भरपाई मिळणार. मुंबई प्रवेशद्वाराच्या पाच पथकर स्थानकावर सवलत दिल्यामुळे महामंडळास द्यावी लागणारी भरपाई.
(सार्वजनिक बांधकाम विभाग)

मोठी बातमी! गौतम अदानींना अमेरिकेतील ‘त्या’ प्रकरणात ‘क्लीन चिट’ समूहाने केला मोठा खुलासा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube